विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली – देशात कोरोनाविरुद्धच्या लढाईत भारतीय हवाई दल मोलाची भूमिका बजावत आहे. परदेशातून ऑक्सिजन, औषधे, पीपीई किट यासारखे वैद्यकीय साहित्य एअरलिफ्ट करण्याचे काम सातत्याने हवाई दलाकडून केले जात आहे. भारतीय हवाई दलाने कोविड रुग्णांच्या मदत कार्यासाठी ४२ मालवाहू विमाने तैनात केली आहेत. यात १२ अधिक वजन तर ३० मध्यम वजनाचे साहित्य वहन करू शकणाऱ्या विमानांचा समावेश आहे. Air force doing great job in corona war
लष्कराचे जवान हवाई आणि जहाजाच्या मदतीने अन्य देशातील मदत भारतापर्यंत आणत आहेत. कोरोनाचा हाहा:कार पाहता अमेरिका, इस्राईलसह अनेक देशांनी वैद्यकीय साहित्याचा पुरवठा केला आहे. हे साहित्य हवाई दलाचे विमान देशातील विविध भागात पोचवण्याचे काम करत आहे. मदतकार्य करताना हवाई दलातील कर्मचारी बाधित होणार नाही, याचीही काळजी घेतली जात आहे.
तब्बल ४२ विमानांच्या मदतीने भारतात आतापर्यंत मोठ्या प्रमाणात वैद्यकीय सामग्री आणण्यात आली आहे. या विमानांच्या मदतीने वैद्यकीय साहित्य, कर्मचारी आणि उपकरणांची संबंधित ठिकाणी ने आण केली जात आहे. आतापर्यंत हवाई दलाने ७५ ऑक्सिजन कंटेनर आणले आहेत आणि अजूनही आणण्यात येत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App