चीनसोबतचा तिढा कायम, पूर्व लडाखमध्ये हवाई दलाची तैनाती सुरूच, हवाई दल प्रमुखांची माहिती

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : चीनसोबतचा तिढा अद्याप कायम असल्याने पूर्व लडाखमध्ये भारतीय हवाई दलाची तैनाती सुरूच असून, आवश्यकता भासल्यास तेथील फौजांची संख्या वाढवण्यास हवाई दल सज्ज आहे, असे हवाई दलप्रमुख एअर चीफ मार्शल व्ही. आर. चौधरी यांनी शनिवारी सांगितले.Air force deployment in East Ladakh continues, says Air Chief

दुंडिगल येथील एअर फोर्स अकादमीतील एका संयुक्त पदवीदान परेडनिमित्त पत्रकारांशी बोलताना एअर चीफ मार्शल व्ही. आर. चौधरी म्हणाले, पूर्व लडाखच्या काही भागांतून सैन्यमाघारी झाली असली, तरी संपूर्ण सैन्य अद्याप माघारी गेलेले नाही.



मी फार तपशील सांगू शकणार नाही, मात्र एवढे सांगणे पुरेसे आहे की आम्ही तेथे तैनात आहोत. या भागात आमच्यापुढे उभे ठाकणाऱ्या कुठल्याही आव्हानाला अत्यंत कमी वेळात तोंड देण्याची आमची तयारी आहे. अर्थातच, गरज भासली तर आम्ही अधिक सैन्य तैनात करू.

Air force deployment in East Ladakh continues, says Air Chief

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात