विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या लक्षणांबाबत वारंवार आरोग्य तज्ज्ञ माहिती देत आहेत. खोकला, ताप, नाक वाहणे, कफ ही चार लक्षणं आहेत. अशात आता एम्सने या व्हायरसची पाच लक्षणं सांगितली आहेत. तसंच ही लक्षणं दिसली तर त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा असंही एम्सने सांगितले आहे.AIIMS reported five dangerous symptoms of omikron
काय आहेत पाच लक्षणं?
ही लक्षणं चार दिवसांपेक्षा जास्त असतील तर तातडीने डॉक्टरांकडे जा .आरोग्य तज्ज्ञांनी हे देखील सांगितलं आहे की त्वचा, ओठ, नखांचा रंग बदलला तरीही सावध व्हा. तातडीने डॉक्टरांकडे संपर्क साधा असंही सांगण्यात आलं आहे.
मुंबईत ओमिक्रॉनचा वाढता धोका: २०टक्के पेक्षा जास्त रुग्ण आढळल्यास सोसायट्या सीलबंद करणार
कोरोनाची चाचणी कधी करावी?
जर कोरोना झाला आहे याबाबत जर कुणी माहिती दिली तर त्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीने पाच दिवसात काही लक्षणं दिसली तर चाचणी करावी. ज्या कुणाला लक्षणं दिसतील त्यांनी क्वारंटाईन व्हावं. तसंच चाचणी निगेटिव्ह येईपर्यंत क्वारंटाईन रहावं.
इलिनॉस डिपार्टमेंट ऑफ पब्लिस हेल्थचे संचालक डॉ. नगोजी इजीके यांनी सांगितलं आहे की संक्रमित झाल्यानंतरची लक्षणं आणि आधीची लक्षणं वेगळी असू शकतात. लवकर टेस्ट करणं चांगलं ठरतं असंही त्यांनी सांगितलं आहे.
कोव्हिडची चाचणी निगेटिव्ह आली तरीही असं समजू नका की तुम्ही निगेटिव्ह आहात. टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतरही जर घसा खवखवणं, डोकेदुखी, ताप, अंगदुखी होते आहे तर काही दिवस जाऊ देऊन पुन्हा टेस्ट करावी.
जर आपण एखाद्या कोव्हिड झालेल्या रूग्णाच्या संपर्कात आलो आहोत असं कुणाला वाटत असेल आणि जर त्या व्यक्तीने लस घेतली नसेल तर त्या व्यक्तीने तातडीने क्वारंटाईन होण्याची गरज आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App