JAWED HABIB : थुंक में जान है, म्हणत महिलेवर थुंकून हेअरकट ! महिलेचा संताप-गल्लीबोळातल्या न्हाव्याकडून केस कापा पण हबीबकड़ून नको …


विशेष प्रतिनिधी

मुंबई : हेअरस्टायलिस्ट जावेद हबीबचा एका व्हिडीओनं सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे . एरव्ही जावेद हबीबकडून हेअरड्रेसिंग किंवा हेअर स्टायलिंग करुन घेण्यासाठी अनेकजण उत्सुक असतात. पण, हा व्हिडीओ पाहिल्यानंतर मात्र अनेकांचीच ही इच्छा नाहीशी झाली. कारण ठरलंय हबीबचे हे घाणेरडे कृत्य. मुझफ्फरनगर येथे आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमामध्ये हबीब हेअरकट करताना चक्क महिलेच्या केसांत थुंकला आणि वरतुन निर्लज्जपणे थुंक में जान है देखील म्हणाला …. JAWED HABIB: I have life in spit, saying spit haircut on woman! Woman’s anger – cut your hair from the alley bath but not from Habib …

यावर आता त्या महिलेची प्रतिक्रिया देखील आली आहे…

‘मी त्यांच्याकडे केस कापले नाहीत. त्यांनी मला खूप चुकीची वागणूक दिली. ही अशी अपमानास्पद वागणूक मिळाल्यामुळं मी हेअरकट केला नाही.
मी एखाद्या गल्लीबोळातल्या न्हाव्याकडून केस कापेन पण, हबीबकड़ून कधीच कापणार नाही’, असं ती म्हणाली होती.

काय आहे प्रकरण?

प्रसिद्ध हेअरस्टायलिस्ट जावेद हबीब(Jawed Habib)चा एक व्हिडिओ सोशल मीडिया(Social Media)वर व्हायरल झाला होता. यात तो एका महिलेचे केस कापताना दिसत होता. हा व्हिडिओ व्हायरल (Viral) झाला. जावेद हबीबनं थुंकून (Spitting) केस कापल्याचा आरोप महिलेनं केलाय.

मुजफ्फरनगरमधला प्रकार

हा व्हिडिओ मुजफ्फरनगरचा होता. व्हिडिओमध्ये जावेद हबीब एका महिलेला केस कापण्यासाठी बोलावतो. केस कापताना तो म्हणतो, ‘माझे केस घाणेरडे आहेत, का घाणेरडे आहेत, तर मी शाम्पू लावला नाही. नीट ऐका… पाण्याची कमतरता असेल तर… या थुंकीत प्राण आहे’. यावेळी तिथं उपस्थित असलेल्यांनी जोरदार टाळ्या वाजवल्या. मात्र ज्या महिलेचे केस कापले जात आहेत, ती मात्र कम्फर्टेबल नव्हती. आता या महिलेची प्रतिक्रियाही आलीय. काल व्हायरल झालेला आणि वादग्रस्त हाच तो व्हिडिओ…

 

प्रथमत: हबीबनं झाल्या प्रकरणावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. पण, त्यानंतर मात्र आता त्यानं एका व्हिडीओच्या माध्यमातून माफी मागितल्याचं म्हटलं जात आहे.

‘माझ्या सेमिनारमध्ये मी सांगितलेल्या काही गोष्टींमुळे काहींना वाईट वाटलं आहे. पण, मी एक गोष्ट सांगू इच्छितो की, या सेमिनारमध्ये सर्व प्रोफेशनल व्यक्ती आलेल्या असतात. पण, तरीही माझ्या वागण्या- बोलण्यानं कोणालाही वाईट वाटलं असेल, तर खरंच मला क्षमा करा… मनापासून माफी मागतोय’, असं तो म्हणाला.  आपल्या कृतीबाबत हबीबनं दिलगिरी व्यक्त केल्यानंतरही त्याच्यावर असणारा रोष काही कमी झालेला नाही.

JAWED HABIB : I have life in spit, saying spit haircut on woman! Woman’s anger – cut your hair from the alley bath but not from Habib …

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय