Delhi-NCR : दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपानंतर ‘आफ्टरशॉक’ येऊ शकतात, केंद्राने दिला इशारा

Delhi-NCR

जाणून घ्या, केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी काय म्हटले आहे?


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : Delhi-NCR दिल्ली-एनसीआरमध्ये सोमवारी सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले. यानंतर लोक प्रचंड घाबरले आहेत. दरम्यान, केंद्र सरकारने पुन्हा एकदा दिल्लीत भूकंपाचे ‘आफ्टरशॉक’ म्हणजेच सौम्य धक्क्यांचा इशारा दिला आहे. केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी लोकांना घाबरून न जाण्याचे आणि सुरक्षिततेची खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.Delhi-NCR

केंद्रीयमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एक पोस्ट पोस्ट केली. ज्यामध्ये त्यांनी राजधानी दिल्लीतील लोकांना संयम राखण्याचे आणि सुरक्षिततेची खबरदारी घेण्याचे आवाहन केले. शिवाय भूकंपाच्या धक्क्यांना सामोरे जाताना घाबरून न जाण्याचेही सांगितले. त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “आज सकाळी ५:३६ वाजता दिल्ली आणि आसपास भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर मी स्वत:, तज्ञ आणि मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांसह बारकाईने लक्ष ठेवून आहेत.



भूकंपानंतरचा धक्का म्हणजे काय?

‘आफ्टरशॉक’ हा भूकंपाचा एक छोटासा प्रकार मानला जातो, जो एखाद्या भागात मोठ्या भूकंपानंतर येतो. भूकंपानंतरचे धक्के देखील धोकादायक ठरू शकतात. भूकंपाच्या वेळी पृथ्वीच्या आतील टेक्टोनिक प्लेट्स हलतात. प्लेट्सच्या हालचालीमुळे ऊर्जा बाहेर पडते. जेव्हा या ऊर्जेला बाहेर पडण्याचा मार्ग सापडत नाही, तेव्हा पृथ्वी थरथरायला लागते. ज्याला भूकंप म्हणतात. मोठ्या भूकंपानंतर, पृथ्वीचे थर नवीन भूगर्भीय स्थितीत स्वतःचे संतुलन साधतात. अशा परिस्थितीत कधीकधी भूकंपाचे सौम्य धक्के येऊ लागतात ज्यांना आफ्टरशॉक म्हणतात. हे भूकंपाचे धक्के मुख्य भूकंपानंतर काही वेळाने किंवा काही तासांनी आणि कधीकधी एक किंवा दोन दिवसांनीही येऊ शकतात.

Aftershocks may occur in Delhi-NCR after earthquake Centre warns

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात