Bill Against Love Jihad : गुजरातमध्ये आता लव्ह जिहाद बेकायदेशीर ठरणार आहे. यासाठी राज्य सरकारने आणलेले धर्म स्वातंत्र्य संशोधन विधेयक-2021 राज्याच्या विधानसभेने संमत केले आहे. याअंतर्गत फसवणूक करून, धमकी, आमिष आणि भीती दाखवून इतर धर्माच्या तरुणीशी लग्न आणि धर्मांतरणासाठी तीन ते 5 वर्षांच्या शिक्षेची आणि दोन लाख रुपये दंडाची तरतूद करण्यात आली आहे. After UP, MP Now Gujarat Assembly also approves Bill Against Love Jihad, 10 years punishment for convicts
विशेष प्रतिनिधी
अहमदाबाद : गुजरातमध्ये आता लव्ह जिहाद बेकायदेशीर ठरणार आहे. यासाठी राज्य सरकारने आणलेले धर्म स्वातंत्र्य संशोधन विधेयक-2021 राज्याच्या विधानसभेने संमत केले आहे. याअंतर्गत फसवणूक करून, धमकी, आमिष आणि भीती दाखवून इतर धर्माच्या तरुणीशी लग्न आणि धर्मांतरणासाठी तीन ते 5 वर्षांच्या शिक्षेची आणि दोन लाख रुपये दंडाची तरतूद करण्यात आली आहे.
अल्पवयीन आणि अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या प्रकरणात ही शिक्षा सात वर्षांची असेल. या कामात एखादी संस्था मदत करत असेल तर 10 वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे. तसेच अशा संस्थेला शासकीय अनुदानही मिळणार नाही.
सरकारने त्यास अजामीनपात्र गुन्हा मानले आहे आणि केवळ पोलीस उपअधीक्षक दर्जाचे अधिकारीच अशा प्रकरणांचा तपास करू शकतील. अशा परिस्थितीत पीडित पालक, भावंड किंवा जवळचे नातेवाईक किंवा दत्तक व्यक्तीही पोलिसांत तक्रार देऊ शकते.
गृह राज्यमंत्री प्रदीपसिंग जडेजा यांनी गुरुवारी विधानसभेत लव्ह जिहादविरोधी विधेयक मांडले. यावेळी सदनात मोठा गोंधळ उडाला. कॉंग्रेसचे आमदार इम्रान खेडावाला यांनी या विधेयकाची प्रत सभागृहातच फाडली. प्रदीपसिंग जडेजा यांनी हे विधेयक फाडण्याबद्दल कॉंग्रेस आमदारावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशनात गृह राज्यमंत्री प्रदीपसिंग जडेजा यांनी 2003चे धर्म स्वातंत्र्य कायदा दुरुस्ती विधेयक मांडले. तथापि, त्यात लव्ह जिहाद हा शब्द वापरलेला नाही. जडेजा यांनी सभागृहात तासभर यावर आपले मत मांडले. ते म्हणाले की, हा कायदा बर्याच राज्यांत आणि इतर देशांमध्येही आहे.
हिंदू समाजात मुलींना काळजाचा तुकडा मानले जाते. त्यांना जिहादींच्या हातात जाऊ दिले जाऊ शकत नाही. नाव बदलून हिंदू तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून आणि विवाह संबंधांत फसवून धर्मांतरण करणाऱ्या जिहादी तत्त्वांवर कठोर कारवाई गरजेची आहे.
अशा प्रवृत्तीना आळा घालण्यासाठी राज्य सरकारने हा कायदा आणला आहे. त्यांनी केरळच्या एका चर्चच्या अहवालाचा दाखला देत असा दावा केला की, धर्मांतर झाल्यानंतर अशा महिलांचा दहशतवादी प्रवृत्तींसाठी गैरवापर केला जात आहे. दरम्यान, इम्रान खेडावाला यांच्याव्यतिरिक्त आणखी एक कॉंग्रेसचे आमदार ग्यासुद्दीन शेख यांनीही या विधेयकाला विरोध केला.
After UP, MP Now Gujarat Assembly also approves Bill Against Love Jihad, 10 years punishment for convicts
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App