Udayanidhi Stalin Controversial Statement on PM Modi Sushma Swaraj-Jaitley; their daughters Hits Back

उदयनिधी स्टॅलिन यांचे वादग्रस्त वक्तव्य; स्वराज-जेटलींचा मोदींच्या छळामुळे मृत्यू, जेटली-स्वराज कन्यांनी केला पलटवार

Udayanidhi Stalin Controversial Statement : द्रविड मुन्नेत्र कळघमचे प्रमुख एमके स्टॅलिन यांचे सुपुत्र उदयनिधी स्टॅलिन यांनी गुरुवारी आपल्या वक्तव्यांवरून एक नवा वाद उभा केला आहे. उदयनिधी म्हणाले होते की, माजी केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज आणि अरुण जेटली यांचा पंतप्रधान मोदींकडून छळ आणि दबावामुळे मृत्यू झाला. गुरुवारी पंतप्रधान मोदींवर टीका करताना उदयनिधी स्टॅलिन यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले. यावर आता सुषमा स्वराज व अरुण जेटली यांच्या कन्यांनी पलटवार केला असून उदयनिधी यांना खडे बोल सुनावले आहेत. Udayanidhi Stalin Controversial Statement on PM Modi Sushma Swaraj-Jaitley; their daughters Hits Back


विशेष प्रतिनिधी

चेन्नई : द्रविड मुन्नेत्र कळघमचे प्रमुख एमके स्टॅलिन यांचे सुपुत्र उदयनिधी स्टॅलिन यांनी गुरुवारी आपल्या वक्तव्यांवरून एक नवा वाद उभा केला आहे. उदयनिधी म्हणाले होते की, माजी केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज आणि अरुण जेटली यांचा पंतप्रधान मोदींकडून छळ आणि दबावामुळे मृत्यू झाला. गुरुवारी पंतप्रधान मोदींवर टीका करताना उदयनिधी स्टॅलिन यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले. यावर आता सुषमा स्वराज व अरुण जेटली यांच्या कन्यांनी पलटवार केला असून उदयनिधी यांना खडे बोल सुनावले आहेत.

गुरुवारी पीएम मोदींवर टीका करताना उदयनिधी असेही म्हणाले होते की, “पंतप्रधान मोदींनी भाजपमधील ज्येष्ठ नेते उदा. वैंकय्या नायडू यांना बाजूला सारले. त्यांनी अशा सर्वांनाच बाजूला सारले आहे. मोदीजी मी , ई. पलानीस्वामी तुम्हाला भीत नाही, तुमच्यापुढे झुकणार नाही. मी कलाइग्नारचा नातू उदयनिधी आहे.”

Udayanidhi Stalin Controversial Statement on PM Modi Sushma Swaraj-Jaitley; their daughters Hits Back

यादरम्यान उदयनिधी यांच्या गंभीर आरोपांना प्रत्युत्तर देताना सुषमा स्वराज यांच्या कन्या बांसुरी स्वराज म्हणाल्या की, उदयनिधी यांनी आपल्या निवडणूक प्रचारासाठी माझ्या आईंच्या स्मृतीचा वापर करता कामा नये. त्यांनी ट्वीट करून म्हटले की, उदयनिधीजी कृपया माझ्या आईच्या आठवणींचा उपयोग आपल्या निवडणूक प्रचारासाठी करू नका. तुमची वक्तव्ये चुकीची आहेत. पंतप्रधान मोदीजी माझ्या आईचा अत्यंत सन्मान आणि आदर करायचे. आमच्या सर्वात कठीण काळात पंतप्रधान मोदी आणि पक्ष भक्कमपणे आमच्यासोबत उभा राहिलाय. तुमचे वक्तव्य वेदनादायी आहे.

इंडिया टुडेशी बोलताना बांसुरी स्वराज यांनी उदयनिधी यांचे वक्तव्य म्हणजे हीन आणि अपमानकारक म्हटले आहे. त्या म्हणाल्या की, हे अत्यंत हीन आणि चुकीचे आहे. राजकीय मुद्द्यांवर निवडणूक लढण्याऐवजी उदयनिधी माझी आई आणि अरुण जेटलींच्या स्मृतींचा अनादर करत आहेत.

Udayanidhi Stalin Controversial Statement on PM Modi Sushma Swaraj-Jaitley; their daughters Hits Back

याचप्रमाणे अरुण जेटली यांच्या कन्या सोनाली जेटली-बक्षी यांनीही आपल्या दिवंगत वडिलांवरील वक्तव्यांवरून उदयनिधी यांना ट्वीट करून प्रत्युत्तर दिले आहे.

त्यांनी लिहिले की, उदयनिधीजी मला समजतंय की, निवडणुकीचा दबाव आहे. परंतु तुम्ही जर खोटे आणि माझ्या वडिलांच्या स्मृतींचा अनादर करणारे वक्तव्य करत असाल, तर मी गप्प राहू शकत नाही. माझे वडील अरुण जेटली आणि नरेंद्र मोदी यांच्या राजकारणापलीकडचे घनिष्ठ संबंध होते.

 

दरम्यान, दिवंगत सुषमा स्वराज आणि अरुण जेटली हे भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांपैकी एक होते. नरेंद्र मोदी सरकारमध्ये त्यांनी महत्त्वाची खाती सांभाळली. एवढेच नव्हे तर त्यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्येही मंत्रिपद भूषवले होते. अखेरच्या श्वासापर्यंत त्यांनी संसदेत भाजपचे प्रतिनिधित्व केले. तेथे त्यांनी अनेक ऐतिहासिक निर्णयही घेतले. 2016 मध्ये सुषमा स्वराज यांच्या किडनीचे प्रत्यारोपण झाले. यानंतर प्रकृतीच्या कारणांमुळे त्यांनी 2019ची लोकसभा निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला. 6 ऑगस्ट 2019 रोजी वयाच्या 67व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

अरुण जेटलींनीही प्रकृतीच्या कारणास्तव 2019ची लोकसभा लढली नाही. एम्समध्ये दीर्घकाळ उपचारानंतर 24 ऑगस्ट 2019 रोजी वयाच्या 66व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली.

Udayanidhi Stalin Controversial Statement on PM Modi Sushma Swaraj-Jaitley; their daughters Hits Back

महत्त्वाच्या बातम्या

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*