विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : अयोध्येतील राम मंदिर आणि अबुधाबीतील सर्वांत मोठे हिंदू मंदिर यांची उद्घाटने केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नवे हिंदूहृदयसम्राट म्हणून पुढे येतील आणि 2024 च्या निवडणुकांना सामोरे जातील, असे वक्तव्य काँग्रेसचे केरळ मधले खासदार शशी थरूर यांनी केले आहे.After the inauguration of the Ram temple and temples in Abu Dhabi, Modi will emerge as the new Hindu heartthrob; Criticism or praise of Shashi Tharoor??
शशी थरूर यांच्या या वक्तव्याची बातमी थरूरांनी केलेली टीका या स्वरूपात माध्यमांनी रंगवली आहे. पण मूळात दोन मंदिरांची उद्घाटने आणि नरेंद्र मोदींचे हिंदुत्वाचा प्रखर चेहरा म्हणून समोर येणे ही मोदींवरची टीका आहे की भाजपला अनुकूल ठरणारी स्तुती आहे??, हा खरा सवाल आहे!!
22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येचा राम जन्मभूमी मंदिरात श्रीरामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या धार्मिक अनुष्ठानचे नेतृत्व करणार आहेत. राम मंदिराचे लोकार्पण हा आंतरराष्ट्रीय पातळीवरचा सर्वात मोठा इव्हेंट ठरणार आहे. त्या पाठोपाठ फेब्रुवारी महिन्यात संयुक्त अरब अमिरातीत अबुधाबी मध्ये बांधलेल्या सर्वांत मोठ्या हिंदू मंदिराचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत या दोन्ही मंदिरांची उद्घाटने 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी नियोजित आहेत. त्यानंतरच निवडणुकांची अधिकृत घोषणा होणे अपेक्षित आहे.
तशी घोषणा होण्यापूर्वी मोदी दोन मंदिरांची उद्घाटन करणार असल्यामुळे मोदी हे 2024 च्या लोकसभा निवडणुकीला नवे हिंदूहृदयसम्राट म्हणून सामोरे जातील, असे वक्तव्य शशी थरूर यांनी केले. त्यानंतर त्यांनी मोदींना तुम्हीच सांगितलेले अच्छे दिन कुठे आहेत हा सवाल देण्यात येणे विचारला पाहिजे, अशी बोचरी टीका केली आहे. पण ही टीका करण्यापूर्वी मोदी हे नवे हिंदूहृदयसम्राट आहेत, हे वक्तव्य केल्याने शशी थरूर यांनी केलेली टीका ही भाजपसाठी अनुकूलच ठरण्याची शक्यता आहे.
स्वतः मोदी किंवा भाजप हिंदूहृदयसम्राट हा शब्द देखील उच्चारणार नाहीत. कारण संघाच्या पठडीतला हा शब्द नाही. पण दोन मंदिरांचे उद्घाटन केल्यानंतर मात्र मोदी हिंदुत्वाचा प्रखर चेहरा म्हणून समोर येणार हे निश्चित दिसत आहे. या पार्श्वभूमीवर शशी थरूर यांनी केलेले वक्तव्य ही मोदींवरची टीका आहे की भाजपला अनुकूल ठरणारी टिप्पणी आहे??, हा सवाल तयार झाला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App