प्रतिनिधी
मुंबई : इस्लामी जिहादच्या “द केरल स्टोरी” या भीषण वास्तव सिनेमानंतर आता एक धक्कादायक सत्य आभास समोर येत आहे, तो म्हणजे “72 हूरें” हा सिनेमा!! After the gruesome reality of ‘The Kerala Story’, now the shocking reality of ’72 Hooray
‘७२ हूरें’ या चित्रपटाच्या ५२ सेकंदाच्या टीझरमध्ये ओसामा बिन लादेन, अजमल कसाब, याकूब मेमन, मसूद अझहर, हाफिज सईद आणि सादिक सईद यांसारख्या दहशतवाद्यांचा उल्लेख करण्यात आला आहे.
भारतात हिंदू तरुणींच्या हिंदू धर्माविषयी असलेल्या अज्ञानाचा गैरफायदा घेत त्यांचे ब्रेनवॉश करून त्यांचे इस्लाममध्ये धर्मांतर केले जाते. ही मोडस ऑपरेंडी दाखवण्यात आलेल्या ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटाने देशभर खळबळ उडवली. आता भारतात दहशतवादी कारवाया घडवून आणण्यासाठी तरुणांचे ब्रेनवॉश कसे केले जाते ही मोडस ऑपरेंडी दाखवणारा चित्रपट ‘७२ हूरें’ (72 Hoorain) ७ जुलै रोजी प्रदर्शित होत आहे.
टीझर लॉन्च
‘७२ हूरें’ या चित्रपटाच्या ५२ सेकंदाच्या टीझरमध्ये ओसामा बिन लादेन, अजमल कसाब, याकूब मेमन, मसूद अझहर, हाफिज सईद आणि सादिक सईद यांसारख्या दहशतवाद्यांचा उल्लेख करण्यात आला आहे. अतिरेक्यांच्या नेत्यांची चिथावणीखोर भाषणाची पार्श्वभूमी या टीझरमध्ये देण्यात आली आहे. या टीझरमध्ये ब्रेनवॉश करताना अतिरेक्यांचे नेते म्हणतात, ‘इस्लाम प्रसाराचा जो रस्ता तुम्ही स्वीकारला आहे तो तुम्हाला सरळ जन्नतमध्ये पोहोचवणारा आहे, तिथे ७२ कुमारिका मुली तुमच्या कायमच्या सेवेत राहतील.’
यासंदर्भात दहशतवाद हा जगभर चिंतेचा विषय आहे, हे दहशतवादी कोणत्याही इतर ग्रहाचे नाहीत त्यांचा ब्रेनवॉश केल्यामुळे ते जिहादच्या नावाखाली दहशतवादाचा मार्ग पत्करतात, असे निर्मात्यांनी म्हटले आहे. या चित्रपटाची निर्मिती अशोक पंडित यांनी केली असून, याचे दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेते संजय पूरण सिंह चौहान यांनी केले आहे. चित्रपट ७ जुलै २०२३ रोजी देशभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App