रशियानंतर पंतप्रधान मोदींनी ऑस्ट्रियातही दिला शांततेचा संदेश; म्हणाले ‘निरपराधांचा मृत्यू मान्य नाही’


ही युद्धाची वेळ नाही, असा पुनरुच्चार मोदींनी केला आहे.


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली: रशियाच्या दौऱ्यानंतर ऑस्ट्रियाला पोहोचलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी युक्रेन आणि रशियामध्ये सुरू असलेल्या युद्धाची भीषणता संपवण्याचा मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित केला आहे. ही युद्धाची वेळ नाही, असा पुनरुच्चार मोदींनी केला आहे. तसेच, कीवस्थित मुलांच्या रुग्णालयावर नुकत्याच झालेल्या रशियन हल्ल्यात ठार झालेल्या युक्रेनच्या मुलांच्या मृत्यूचा मुद्दा सलग दुसऱ्या दिवशीही गाजला.After Russia Prime Minister Modi sent a message of peace to Austria



ऑस्ट्रियाचे चॅन्सलर कार्ल नेहॅमर यांच्याशी द्विपक्षीय चर्चेनंतर संयुक्त पत्रकार परिषदेत बोलताना मोदी म्हणाले की, निष्पाप मुलांचे प्राण गमावणे मान्य नाही. गेल्या तीन दिवसांत भारताच्या पंतप्रधानांनी तीनदा मुलांच्या मृत्यूचा मुद्दा उपस्थित केला आहे. पंतप्रधान गुरुवारी सकाळी भारतात परततील. व्हिएन्नामध्ये पंतप्रधान मोदींनी रशियाला शांततेचा संदेश दिला.

मोदी म्हणाले, ‘येथे १९व्या शतकात ऐतिहासिक व्हिएन्ना काँग्रेसचे आयोजन करण्यात आले होते. त्या परिषदेने युरोपमधील शांतता आणि स्थैर्याला दिशा दिली. युक्रेनमधील संघर्ष असो किंवा पश्चिम आशियातील परिस्थिती असो, जगात सुरू असलेल्या सर्व संघर्षांबद्दल चान्सलर नेहॅमर आणि मी विस्तृतपणे बोललो आहोत. ही युद्धाची वेळ नाही, असे मी यापूर्वीही म्हटले आहे. युद्धभूमीवर समस्या सोडवता येत नाहीत.

पंतप्रधान म्हणाले, ‘निष्पाप लोकांचे प्राण जाणे मान्य नाही. भारत आणि ऑस्ट्रिया शांतता आणि स्थिरता लवकरात लवकर पुनर्संचयित करण्यासाठी संवाद आणि मुत्सद्देगिरीवर भर देतात. यासाठी आम्ही दोघेही शक्य ते सर्व सहकार्य करण्यास तयार आहोत. याच परिषदेत ऑस्ट्रियाचे चांसलर नेहॅमर म्हणाले की, भारत हा एक प्रभावशाली देश आहे आणि त्याची स्वतःची विश्वासार्हता आहे, जो युक्रेन-रशिया शांतता प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावू शकतो.

After Russia Prime Minister Modi sent a message of peace to Austria

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात