भारताचा झिम्बाब्वेवर 23 धावांनी विजय, सलग दुसरा T20 सामना जिंकला!

या विजयाबरोबरच मालिकेत भाजपने 2-1 ने आघाडी घेतली आहे.


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील तिसऱ्या सामन्यात टीम इंडियाने 23 धावांनी विजय मिळवत मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे. या सामन्यात झिम्बाब्वे संघ विशेष काही कमाल दाखवू शकला नाही. सिकंदर रझा संघ पुन्हा एकदा बॉलिंग आणि बॅटींगमध्ये फ्लॉप ठरला.India beat Zimbabwe by 23 runs win second T20 match in a row



हरारे स्पोर्ट्स क्लबमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि 20 षटकात 4 गडी गमावून 182 धावा केल्या. या सामन्यात शुभमन गिलने आपल्या टी-20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील तिसरे अर्धशतक झळकावले. त्याचवेळी ऋतुराज गायकवाड 49 धावांची शानदार इनिंग खेळून पॅव्हेलियनमध्ये परतला. प्रत्युत्तरात झिम्बाब्वे संघाला 20 षटकांत 6 बाद 159 धावा करता आल्या.

झिम्बाब्वेने सात षटकांत पाच विकेट गमावल्या. या सामन्यात मारुमणी 13, बेनेट 04, रझा 15, कॅम्पबेल एक धावा काढून बाद झाला. यानंतर माईर्स व मदंडे यांनी सहाव्या विकेटसाठी 77 धावांची भागीदारी झाली, जी सुंदरने मोडली. त्याने मदंडे यास बाद केले. तो 26 चेंडूत 37 धावा करून बाद झाला. त्याचवेळी मायर्सने 49 चेंडूत 65 धावा केल्यानंतर तो नाबाद राहिला. त्याने 45 चेंडूत पहिले T20 आंतरराष्ट्रीय अर्धशतक झळकावले. याशिवाय मसाकादजा 18 धावा करून नाबाद राहिला. भारतातर्फे सुंदरने तीन आणि आवेशने दोन गडी बाद केले. त्याचवेळी खलीलच्या नावावर एक विकेट होती.

India beat Zimbabwe by 23 runs win second T20 match in a row

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात