विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : दुसऱ्या तिमाहीतील जीडीपीच्या घौडदोडीनंतर वस्तू आणि सेवा कर म्हणजे जीएसटीच्या महसुलाने पुन्हा एकदा एक लाख कोटींचा आकडा ओलांडला आहे. जुलै महिन्या जीएसटीतून 1.12 लाख कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला असून.After GDP, GST also races, GST revenue rises to Rs 1 lakh crore for second time in a row
यात महाराष्ट्र, कर्नाटक आणि तामिळनाडूची दमदार कामगिरी राहिली आहे. मागील वर्षी याच काळात मिळालेल्या जीएसटीच्या तुलनेत यावेळच्या महसुलात 30 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
केंद्रीय अर्थमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, जुलै महिन्यातील जीएसटीची ही कमाई अर्थव्यवस्थेला केवळ बळकटी देणारीच नसून, आपली अर्थव्यवस्था गतीने वर येत आहे आणि ती मोठी झेप घेत असल्याचे संकेतही आहे. महाराष्ट्रातील तीन राज्यांनी उत्पादन क्षेत्रात चांगली कामगिरी केल्यामुळेच जीएसटी महसुलात सलग दुसºया महिन्यात विक्रमी वाढ झाली आहे.
दोन दिवसांपूर्वीच अर्थमंत्रालयाने जीडीपीचा तिमाही अहवाल जाहीर केला. यात जीडीपीने 20.01 टक्के अशी भरारी घेतली असल्याचे दिसून आले. त्यात आता जीएसटीने एक लाख कोटींचा आकडा गाठला. अर्थव्यवस्था मजबूत होत असल्याचे हे संकेत असल्याचे अर्थमंत्रालयाने म्हटले आहे.
जुलै महिन्यात मिळालेल्या 1.12 लाख कोटींच्या जीएसटी महसुलात केंद्रीय जीएसटीचा वाटा 20,522 कोटी, राज्य जीएसटीचा वाटा 26,605, एकात्मिक जीएसटीचा वाटा 56,247 कोटी आणि अधिभाराचा वाटा 8,646 कोटी रुपये इतका आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App