वृत्तसंस्था
नवी दिल्ली : महाराष्ट्रातील जवळपास 75 टक्के मंत्र्यांनी आपल्याविरुद्ध गुन्हेगारी खटले असल्याची माहिती दिल्याचे असोसिएशन फॉर डेमॉक्रॅटिक रिफॉर्म्सच्या (एडीआर) अहवालात म्हटले आहे.ADR report Criminal cases against 15 out of 20 Maharashtra ministers 11 Minister Degree, Post Graduate Degree Holders
महाराष्ट्रात 9 ऑगस्ट रोजी करण्यात आलेल्या मंत्रिमंडळ विस्तारात 18 मंत्र्यांना शपथ देण्यात आली. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह सध्या 20 जणांचे मंत्रिमंडळ आहे. 2019च्या विधानसभा निवडणुकीवेळी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात 75% मंत्र्यांनी (20 पैकी 15 मंत्री) त्यांच्याविरुद्ध गुन्हेगारी खटले दाखल असल्याचे नमूद केले आहे.
एडीआर आणि महाराष्ट्र इलेक्शन वॉचने मंत्रिमंडळ विस्तारातील मंत्र्याच्या गुन्हेगारी खटल्यासंबंधीचे विश्लेषण केले आहे. सर्व मंत्री कोट्यधीश असून त्यांची सरासरी मालमत्ता 47.45 कोटी रुपये आहे. मलबार हिल मतदारसंघाचे आमदार मंगलप्रभात लोढा 441.65 कोटी रुपये मालमत्तेसह अव्वल आहेत. संदिपान भुमरे यांची मालमत्ता सर्वात कमी (2.92 कोटी) आहे. 8 मंत्री (40%) इयत्ता दहावी ते बारावीपर्यंत शिकले आहेत.
11 मंत्री पदवी, पदव्युत्तर पदवीधारक
11 मंत्र्यांचे (55%) पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण झाले आहे. एक मंत्री पदविकाप्राप्त आहे. चार मंत्री 41 ते 50 वयोगटातील, तर उर्वरित 51 ते 70 वयोगटातील आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी मंत्रिमंडळाचा विस्तार केला. त्यात 18 मंत्र्यांना शपथ देण्यात आली आहे. यात शिंदे गट आणि भाजपमधील प्रत्येक 9 जणांचा समावेश आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App