मुस्लिम मुलीशी लग्न : आदिवासी युवक दीपक बर्डेची अपहरण करून हत्या, मृतदेह फेकला नदीत!

प्रतिनिधी

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यात उलटा लव्ह जिहाद घडला आहे. इतकेच नाही तर आदिवासी युवकाची हत्या करण्यात आली आहे. श्रीरामपूर तालुक्यातील भोकर येथील दीपक बर्डे या आदिवासी भिल्ल युवकाचा अपहरण करून खून केला आहे. दीपकचा खून करून मृतदेह गोदावरी नदीत फेकल्याची कबुली या प्रकरणात अटकेत असलेल्या आरोपींनी दिली आहे. मजनू शेख, इमरान शेख, समीर शेख, अजीज शेख अशी आरोपींची नावे आहेत. Adiwasi youth Deepak Barde was kidnapped and killed

मुस्लीम तरुणीशी विवाह केल्यानंतर महिनाभराने या सर्व आरोपींनी या तरुणाचे अपहरण केले होते. मित्रासोबत नोकरी शोधण्यासाठी पुण्यात जातो असे सांगून 30 ऑगस्ट रोजी घराबाहेर पडलेला दीपक बर्डे परतलाच नाही.

श्रीरामपूर तालुक्यातील भोकर येथे राहणा-या दीपक बर्डे या आदिवासी भिल्ल समाजाच्या तरुणाचे मुस्लीम मुलीशी प्रेम जुळले होते. या संबंधांना मुलीच्या घरच्यांना मात्र तीव्र विरोध होता. दोघेही सज्ञान असल्याने घरच्यांच्या विरोधात जाऊन दोघांनी महिन्यापूर्वी लग्नगाठ बांधली आणि आयुष्यभरसोबत राहण्याच्या आणाभाकाही घेतल्या. मात्र मुलीच्या घरच्यांनी दीपकला मारहाण आणि दमदाटी करत तिला परत घरी नेले होते. आपली पत्नी पुण्यात तिच्या मामाच्या घरी असल्याचे कळल्यानंतर, 30 ऑगस्ट रोजी दीपकने घरच्यांना आपण मित्रासोबत नोकरी शोधायला पुण्यात जात असल्याचे सांगत पुणे गाठले. परंतु पत्नीला भेटण्याच्या आतच दीपकला मुलीच्या मामाने गाठले आणि त्याला मारहाण करत त्याचे अपहरण केले, असे दीपकच्या सोबत असलेल्या मित्राने सांगितले.

आरोपींनी खून केल्याची दिली कबूली 

आपला मुलगा बेपत्ता झाल्यानंतर कुटुंबियांनी घातपाताचा संशय व्यक्त केला. वडिलांच्या फिर्यादीनंतर श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणी सात जणांना अटक केली आहे. आता या आरोपींनी दीपक बर्डेचा खून केल्याची कबुली दिली आहे. त्यामुळे पोलिसांनी गोदावरी नदीपात्रात मृतदेह शोधण्यासाठी शोधमोहीम सुरू केली आहे.

Adiwasi youth Deepak Barde was kidnapped and killed

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात