चांद्रयान 3 पाठोपाठ दुसरे यश; आदित्य L-1 झेपावले सूर्याच्या दिशेने, करणार 15 लाख किलोमीटचा प्रवास!!


वृत्तसंस्था

श्रीहरीकोटा : चांद्रयान 3 पाठोपाठ भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोच्या यशामध्ये आणखी एक मानाचा तुरा खाऊला गेला असून आदित्य L – 1 सूर्याच्या दिशेने झेपावले आहे. Aditya L-1 launched towards the Sun

चांद्रयानाला मिळालेल्या यशापाठोपाठ इस्रोने लगेचच आणखी एका महत्त्वपूर्ण मोहिमेवर लक्ष केंद्रीत करून आदिच्य एल 1 सूर्याच्या दिशेने पाठविले.

भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोच्या मोहिमांकडे असणाऱ्या जगाच्या नजरा पाहता ही बाब अगदी सहजपणे लक्षात येते. 14 जुलै 2023 रोजी भारताने चांद्रयान 3 चंद्राच्या दिशेने पाठविले आणि साधारण 45 दिवसांच्या कालावधीत या यानाने चंद्राचा दक्षिण ध्रुव गाठला. असे करणारा भारत पहिला देश आणि चंद्र गाठणारा चौथा देश ठरला. तिथे चांद्रयान मोहिमेतून अनेक पैलू असणारी चंद्राविषयीची महिती विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर इस्रोकडे पाठवत असतानाच आता भारतीय अंतराळ संशोधन संस्था आणखी एका मोहिमेसाठी सज्ज झाली.

सूर्य मोहीम अर्थात आदित्य एल – 1 असे या मोहिमेचे नाव असून, 2 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 11.50 वाजता श्रीहरिकोटा येथून भारताच्या या यानाने अवकाशाच्या दिशेने झेप घेतली. इस्रोच्या सतीश धवन सेंटर मध्ये यावेळी हजारो लोक या अत्यंत अभिमान क्षणाचे साक्षीदार ठरले.

असे आहे मिशन आदित्य

‘हे मिशन खूप महत्त्वाचे आहे. आदित्य एल -1 हे लॅग्रॅन्गियन पॉइंट-1 च्या आजूबाजूला ठेवले जाईल, जिथे पृथ्वी आणि सूर्याची गुरुत्वाकर्षण शक्ती जवळजवळ कमी होईल आणि कमीतकमी इंधनासह, तेथे अंतराळ यानाची देखभाल करता येईल. शिवाय, तेथून सुर्याचे 24/7 निरीक्षण शक्य आहे. या अंतराळ यानात 7 उपकरणे बसविण्यात आली आहेत. या मिशनचा डेटा वातावरणात घडणाऱ्या सर्व घटना, हवामान बदलाचा अभ्यास इत्यादी समजून घेण्यास मदत करेल, अशी प्रतिक्रिया इस्रोचे माजी चेअरमन जी. माधवन नायर यांनी दिली.

  • सूर्य मोहिमेमध्ये इस्रोपुढे महत्त्वाचे आव्हान असणार आहे ते म्हणजे सूर्याच्या लँग्रेज पॉईंटपर्यंत पोहोचण्याची. शिवाय यानाला योग्य कक्षेत पोहोचवणेही जोखमीचे काम ठरणार आहे.
  • सूर्य मोहिमेमध्ये इस्रोपुढे महत्त्वाचे आव्हान असणार आहे ते म्हणजे सूर्याच्या लँग्रेज पॉईंटपर्यंत पोहोचण्याची. शिवाय यानाला योग्य कक्षेत पोहोचवणंही जोखमीचं काम ठरणार आहे.
  • आदित्य एल – 1 125 दिवसांनी ते निर्धारित स्थळी म्हणजेच टार्गेट पॉईंटवर पोहोचणार आहे. जवळपास 4 महिन्यांच्या या प्रवासात यान 15 लाख किलोमीटर इतके अंतर ओलांडणार असून, हे अंतर चंद्राच्या तुलनेत तब्बल 5 पटींनी जास्त आहे.

Aditya L-1 launched towards the Sun

महत्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात विठ्ठल रखुमाईला शोभुनी दिसतो तिरंगा!