विशेष प्रतिनिधी
पुणे: माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु आणि महात्मा गांधी यांच्या विरोधात अभिनेत्री पायल रोहतगी हिने वादग्रस्त व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केल्याप्रकरणी पुण्यातील शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस संगीता तिवारी यांनी तक्रार दिली आहे.Actress Payal Rohatgi has been booked in Pune, Congress has lodged a complaint
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,राष्ट्रपिता महात्मा गांधी, माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरु, इंदिरा गांधी आणि त्यांचे कुटुंबीय, काँग्रेस परिवार यांच्याविषयी खोटा बदनामीकारक व्हिडिओ तयार करुन तो सोशल मीडियावर पायल रोहतगी यांनी पोस्ट केला.
त्या माध्यमांतून हिंदू मुस्लिम समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे, अशी तक्रार संगीता तिवारी यांनी दिली होती. त्या आधारे पायल रोहतगी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे शिवाजीनगर पोलिसांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App