हनी ट्रॅपमध्ये अडकवून २५ लाख रुपयांची केली मागणी, ११ लाख घेतले
विशेष प्रतिनिधी
कोल्लम : मल्याळम टीव्ही अभिनेत्री नित्या सासी आणि तिच्या मित्राने परवूर येथील एका ७५ वर्षीय माजी सैनिकास २५ लाख रुपये उकळण्यासाठी हनी ट्रॅपिंगमध्ये अडकवल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.
Actress Nitya Sasi blackmailed a 75 year old man by removing nude photos extorted Rs 11 lakh
नित्या सासी (वय 32, रा. मलयालपुझा, पठानमथिट्टा) आणि कलईकोडे, परावूर येथील बिनू यांना अटक करण्यात आली. विशेष म्हणजे नित्या वकील आहे. या दोघांनी पीडित व्यक्तीस २५ लाख रुपये मागितले होते, त्यातील ११ लाख रुपये दिले गेले होते.
भाड्याने घर शोधत असताना नित्याची पीडित व्यक्तीशी भेट झाली होती आणि त्यांची मैत्री झाली. यानंतर नित्याने पीडित व्यक्तीला घरी बोलावले आणि त्यांचे नग्न छायाचित्र काढून त्यांना ब्लॅकमेल केल्याचा आरोप आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App