तामिळनाडूत भाजपाच्या ‘एन मन, एन मक्कल’ पदयात्रेस सुरुवात; अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा, म्हणाले…


रामेश्वरम येथून या पदयात्रेला सुरुवात करण्यात आली आहे.

विशेष प्रतिनिधी

रामेश्वरम : तामिळनाडूमध्ये भाजपाने आजपासून (२८ जुलै) सहा महिने चालणारी ‘एन मन, एन मक्कल’ (माझी जमीन, माझी जनता) पदयात्रा सुरू केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रामेश्वरम येथून या पदयात्रेला सुरुवात केली. BJPs En Man En Makkal padayatra begins in Tamil Nadu Amit Shah targets opponents

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह रामेश्वरम येथील ‘एन मन एन मक्कल’ पदयात्रेच्या मेळाव्यात म्हणाले, “ही यात्रा तामिळनाडूला घराणेशाहीपासून मुक्त करण्याचा प्रवास आहे. ही यात्रा तामिळनाडूला पुन्हा विकासाकडे नेण्याची यात्रा आहे. हा आमचा हा संदेश आमच्या तामिळनाडूच्या गावोगावी नेण्याचे काम सर्व कार्यकर्ते करतील.

अमित शाह म्हणाले, “मी काँग्रेस पक्ष आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांना सांगू इच्छितो की नाव बदलून काहीही होत नाही. लोकांमध्ये जाताच लोकांना कॉमनवेल्थ घोटाळा, 2जी घोटाळा, कॉमनवेल्थ घोटाळा, कोळसा घोटाळा आठवतो. हेलिकॉप्टर घोटाळा, पाणबुडी घोटाळा, इस्रो घोटाळा आणि बरेच काही.”

याचबरोबर  अमित शाह पुढे म्हणाले, “श्रीलंकेत तामिळींची हत्याकांडं या काँग्रेस-यूपीए सरकारच्या काळात घडली. त्यांच्या राजवटीत तामिळ मच्छिमारांच्या दुर्दशेला द्रमुक आणि काँग्रेस जबाबदार आहेत. विरोधी पक्षांचे सर्व पक्ष आपल्या कुटुंबांना पुढे नेण्यात गुंतली आहेत.”

BJPs En Man En Makkal padayatra begins in Tamil Nadu Amit Shah targets opponents

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात