इंडियन मेडीकल असोसिएशनचे (आयएमए) अध्यक्ष जा जायलाल यांचा संपूर्ण भारताला ख्रिश्चन बनविण्याचा डाव आहे. त्यामुळेच योगा आणि आयुर्वेदाला बदनाम केले जात असल्याचा आरोप योगगुरू बाबा रामदेव यांचे सहकारी आणि पतंजली योगपीठाचे महामंत्री आचार्य बालकृष्ण यांनी केला आहेAcharya Balakrishna alleges that IMA President Ja Jayalal’s plot to convert India to Christianity is the reason why Ayurveda and Yoga are being discredited
विशेष प्रतिनिधी
हरिद्वार: इंडियन मेडीकल असोसिएशनचे (आयएमए) अध्यक्ष जा जायलाल यांचा संपूर्ण भारताला ख्रिश्चन बनविण्याचा डाव आहे. त्यामुळेच योगा आणि आयुर्वेदाला बदनाम केले जात असल्याचा आरोप योगगुरू बाबा रामदेव यांचे सहकारी आणि पतंजली योगपीठाचे महामंत्री आचार्य बालकृष्ण यांनी केला आहे.
आयएमए आणि बाबा रामदेव यांच्या सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर आचार्य बालकृष्ण यांनी ट्विट केले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, देशात ख्रिश्चन धर्म पसविण्यासाठी हिंदू परंपरेतील योगा आणि आयुर्वेद यांची बदनामी करून लक्ष्य केले जात आहे.
देशवासियांनी आता तरी जागे व्हावे असे हात जोडून आवाहन आहे. अन्यथा पुढील पिढ्या आपल्याला माफ करणार नाहीत.योगगुरू बाबा रामदेव यांनी आयुर्वेदिक चिकित्सा पद्धत कोरोनावर परिणामकारक असल्याचे सांगत अॅलोपॅथीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
T-1 वाह रे, #IMA के विद्वान #डॉक्टर और #वैज्ञानिकों ! आपको प्रमाण एवं अनुसंधान आधारित आयुर्वेदिक औषधियां एवं प्राचीन #योग #विज्ञान pseudo-science दिखता है। pic.twitter.com/IFuUJWhAI0 — Acharya Balkrishna (@Ach_Balkrishna) May 24, 2021
T-1 वाह रे, #IMA के विद्वान #डॉक्टर और #वैज्ञानिकों ! आपको प्रमाण एवं अनुसंधान आधारित आयुर्वेदिक औषधियां एवं प्राचीन #योग #विज्ञान pseudo-science दिखता है। pic.twitter.com/IFuUJWhAI0
— Acharya Balkrishna (@Ach_Balkrishna) May 24, 2021
त्यावरून आयएमएने रामदेव यांनी माफी मागावी अशी मागणी केली. अन्यथा उपचार बंद करू असा इशाराही दिला. केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी बाबा रामदेव यांना पत्र लिहिल्यावर त्यांनी माफी मागितली. परंतु, २५ प्रश्नांची यादीच आयएमएकडे पाठविली.
त्यावरूनच आचार्य बालकृष्ण यांनी कोरोनिलला विरोध ककरणाºयांनी पतंजलीमध्ये यावे, तुमच्या प्रश्नांची उत्तरे आणि प्रमाण देऊ. आयुर्वेदिक उपचार पद्धतीचे अवलंब करून आतापर्यंत लाखो रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
कोरोनाच्या उपचारात आयुर्वेद उपचार पद्धती उपयुक्त ठरत आहे. मात्र, आयुवेर्दाच्या मदतीने तयार केलेल्या कोरोनिलचा विरोध हा खाली खेचण्याचा प्रकार आहे.आचार्य बालकृष्ण म्हणाले, आधुनिक उपचार पद्धतीने काम करणाऱ्यांना स्वप्नातही वाटले नसेल की,
कोरोनावर आयुर्वेदाच्या आधारे तयार केलेले औषध सर्वप्रथम उपलब्ध होईल. मात्र, अशा प्रकारचे औषध अॅलोपॅथीच्या आधी बाजारात आले, तेव्हा एकच खळबळ उडाली. कोरोनिलच्या वापरानंतर लाखो कोरोना रुग्ण बरे झाले आहेत.
कोरोनिलवर केलेले शोध आणि त्याचे प्रमाण दोन्ही आमच्याकडे आहे. जर कोणाला वाटत असेल, तर देशभरातील विद्वान आणि प्रतिथयश तज्ज्ञांचे एक पथक तयार करावे आणि पतंजली योगपीठ संस्थानात पाठवावे. या पथकाचे आम्ही स्वागत करू आणि त्यांना आमचा शोध आणि कोरोनिलवरील प्रमाण देऊ.
तसेच कोरोनिलविषयी त्यांना असलेल्या प्रश्नांची उत्तरेही द्यायला आम्ही तयार आहोत.अनेकांकडून कोरोनिलचे स्वागतकोरोनिलचे अनेकांकडून स्वागत करण्यात आले आहे. मात्र, अनेकांनी पूर्वग्रहदूषित ठेवून याला नावं ठेवण्याचे काम केले,
असा आरोप आचार्य बालकृष्ण यांनी यावेळी केला. तसेच उपचार पद्धती कोणतीही असो, कोरोनाविरोधात एकत्रितपणे लढा देणे आवश्यक आहे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App