यमुनानगर – पंचकुला महामार्गावर भीषण अपघात; आठ जणांचा घटनास्थळीच मृत्यू, १५ पेक्षा अधिकजण गंभीर जखमी!

bus accident

अपघात एवढा भीषण होता की यामध्ये बसचा अक्षरशा चुराडा झाला आहे

विशेष प्रतिनिधी

हरियाणाच्या अंबाला जिल्ह्यातील कक्कड मांजरा गावाजवळ शुक्रवारी रात्री भीषण अपघात घडला. ट्रक आणि बस यांची जोरदार टक्कर झाल्याने ही दुर्घटना घडली. यामध्ये आठ जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर १५ पेक्षा अधिकजण जखमी झाले आहेत. बसमधील प्रवशांमध्ये बहुतांशजण हे रस्ता कामावरील मजूर होते.  Accident on Yamunanagar  Panchkula highway Eight people died on the spot more than 15 seriously injured

प्राप्त माहितीनुसार हा अपघात यमुनानगर – पंचकुला महामार्गावरील कक्कड मांजरा गावाजवळ घडला. जेव्हा बस उत्तर प्रदेशमधील बरेली येथून हिमाचल प्रदेशातील बद्दी येथे जात होती. अपघात इतका भीषण होता की यामध्ये बसचा अक्षरशा चुराडा झाला. तर आठ जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता. शिवाय अनेकजण जखमीही झाले. अपघाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळाकडे धाव घेतली व मदत कार्य सुरू झाले.

अपघातामधील मृतांची ओळख पटवून त्यांच्या नातेवाईकांना माहिती देण्यात आली आहे. बसमधील काही प्रवासी कक्कड मांजरा येथे उतरले होते, त्यानंतर ट्रकने बसला जोरदार धडक दिली. अपघातमधील जखमींना अंबाला सिटी आणि नारायणगढ शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Accident on Yamunanagar  Panchkula highway Eight people died on the spot more than 15 seriously injured

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात