तुरुंगातील इम्रान खान यांच्या राजकीय सल्लागाराचे लाहोरमधून अपहरण!

या घटनेमुळे पाकिस्तानाच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे


विशेष प्रतिनिधी

लाहोर : पाकिस्तानच्या तुरुंगात बंद असलेले माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या राजकीय सल्लागाराचे लाहोरमधून अपहरण करण्यात आले आहे. या घटनेने पाकिस्तानात खळबळ उडाली आहे. पाकिस्तानच्या पंजाब प्रांताची राजधानी लाहोर येथून काही अज्ञात लोकांनी इम्रान खान यांचे राजकीय सल्लागार गुलाम शब्बीर यांचे अपहरण केल्याचे सांगितले जात आहे.Abduction of Imran Khans political advisor from Lahore



गुरुवारी मीडिया रिपोर्ट्समध्ये ही माहिती देण्यात आली. पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) नेते शाहबाज गिल यांचा मोठा भाऊ गुलाम शब्बीर हे दोन दिवसांपूर्वी इस्लामाबादला जात असताना अज्ञात व्यक्तींनी त्यांचे अपहरण केल्याचे वृत्त ‘एक्स्प्रेस ट्रिब्यून’ वृत्तपत्राने दिले आहे.

इम्रान खान यांच्या राजकीय सल्लागाराच्या अपहरणाच्या घटनेने पाकिस्तानात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. त्यांचा मुलगा बिलाल याने एफआयआर दाखल केला आहे, ज्यामध्ये असे म्हटले आहे की शब्बीर हे रात्री उशीरा लाहोरमधील खयाबान-ए-अमीन येथील त्याचे घर सोडले आणि इस्लामाबादच्या दिशेने निघाले होते. या घटनेला 24 तास उलटून गेले आहेत, मात्र आजतागायत पाकिस्तानी पोलिसांना इम्रान खान यांच्या राजकीय सल्लागाराचे अपहरणकर्ते शोधण्यात यश आलेले नाही. त्यामुळे इम्रान खान यांच्या पाकिस्तान-तेहरिक-ए-इन्साफ (पीटीआय) पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. तुरुंगात असलेले इम्रान खानही या घटनेने अचंबित झाले आहेत.

Abduction of Imran Khans political advisor from Lahore

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात