विशेष प्रतिनिधी
लखनौ – उत्तर प्रदेशातील विधानसभेच्या पुढील निवडणुकीत आम आदमी पार्टी सर्व ४०३ जागा लढविणार असल्याची घोषणा पक्षाचे नेते संजय सिंह यांनी केली. अर्थात आपच्या एंट्रीचा फायदा शेवटी भाजपलाचा होण्याची शक्यता असल्याचा राजकीय तज्ञांचा कयास आहे.AAP will contest elections in UP
कारण आपमुळे विरोधी मतांची आणखी फाटाफूट होण्यास मदत होणार आहे. त्याचा फायदा आपसुखपणे भाजपलाच होणार आहे.‘आप’ने २०१४ आणि २०१९ मध्ये लोकसभेच्या तर, प्रदेशातील काही जागांवर उमेदवार उभे केले होते. मात्र त्यांना यश मिळाले नव्हते.
केजरीवाल यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरुद्ध निवडणूक लढविली होती. तेथेही केजरीवाल दुसऱ्या क्रमांकावर राहिले होते. त्यांना काँग्रेसच्या उमेदवारापेक्षा जास्त मते मिळाली होती. संजय सिंह म्हणाले ‘‘आमचा पक्ष उत्तर प्रदेशात काँग्रेस पेक्षा जास्त ताकदवान आहे.
पंचायत निवडणुकीमध्ये काँग्रेसने ४० जागा मिळविल्या होत्या तर ‘आप’ने ८३ जागा मिळविल्या. या निवडणुकीत ‘आप’ला एकूण ४० लाख मते मिळाली, तर पक्षाचे १६०० उमेदवार रिंगणात होते. गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला ४०३ पैकी केवळ सात जागांवर विजय मिळविता आला होता.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App