वृत्तसंस्था
नवी दिल्ली : आम आदमी पक्षाने (आप) राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल ( Swati Maliwal ) यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. ‘आप’ने स्वाती मालीवाल यांना राज्यसभेवर पाठवले होते, मात्र त्या भाजपची स्क्रिप्ट वाचत असल्याचे ‘आप’चे ज्येष्ठ नेते दिलीप पांडे यांनी म्हटले आहे. त्यांना थोडीही लाज असेल तर त्यांनी राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा द्यावा आणि भाजपच्या तिकिटावर राज्यसभेचा मार्ग निवडावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.
वास्तविक, मालीवाल यांनी मंगळवारी एका ऑनलाइन पोस्टमध्ये आतिशी यांच्या मुख्यमंत्रीपदासाठी निवड झाल्याबद्दल तीव्र शब्दात प्रतिक्रिया दिली होती. कालचा दिवस दिल्लीसाठी दु:खद दिवस असल्याचे सांगताना त्यांनी आतिशी यांच्या पालकांनी दहशतवादी अफजल गुरूला फाशीपासून वाचवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला होता.
स्वाती मालीवाल यांचे संपूर्ण विधान…
मालीवाल म्हणाल्या की, आजचा दिवस दिल्लीसाठी अत्यंत दुःखद आहे. आज एका महिलेला दिल्लीचे मुख्यमंत्री बनवले जात आहे, जिच्या कुटुंबाने दहशतवादी अफझल गुरूला फाशीपासून वाचवण्यासाठी दीर्घ लढा दिला. अफझल गुरू निर्दोष असल्याने त्याला फाशी देऊ नये, अशी विनंती त्यांच्या पालकांनी राष्ट्रपतींकडे अनेकवेळा केली होते. तो राजकीय षडयंत्राचा बळी असल्याचे त्यांचे म्हणणे होते.
आज आतिशीजी मुख्यमंत्री होणार आहेत, पण त्या फक्त डमी मुख्यमंत्री बनतील हे आपल्या सर्वांना माहीत आहे. तरीही हा मुद्दा खूप मोठा आहे, कारण त्या नक्कीच मुख्यमंत्री होणार आहेत. हा मुद्दा थेट दिल्ली आणि देशाच्या सुरक्षेशी संबंधित आहे. देव अशा मुख्यमंत्र्यापासून दिल्लीच्या जनतेचे रक्षण करो.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more