स्वाती मालीवाल यांना केजरीवालांच्या घरात मारहाण, पण व्हिडिओचा आधार घेत आम आदमी पार्टीचा भाजपवरच वार!!

AAP Counters Maliwal : Big allegation by Delhi Miniser Atishi in Maliwal’s Assault Case

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : आम आदमी पार्टीच्या खासदार स्वाती मालीवाल यांना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरात मारहाण झाली. ती त्यांचा पीए बिभव कुमार याने केली. पण आता त्या घटनेचा एक कथित व्हिडिओ समोर आल्यानंतर त्या व्हिडिओचा आधार घेऊन आम आदमी पार्टीने भाजपवर कट कारस्थान रचल्याचा वार केला. AAP Counters Maliwal : Big allegation by Delhi Miniser Atishi in Maliwal’s Assault Case

केजरीवालांच्या मंत्रिमंडळातल्या मंत्री आतिशी मार्लेना यांनी पत्रकार परिषद घेऊन अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पार्टीवरचे सगळे आरोप फेटाळले. उलट स्वाती मालीवाल यांना हाताशी धरून भाजपनेच कट कारस्थान रचल्याचा प्रत्यारोप आतिशी यांनी केला.

आतिशी म्हणाल्या :

दारू घोटाळ्यात अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळाल्यापासून भाजपमध्ये खळबळ उडाली आहे. यामुळे भाजपने एक कट रचला, ज्या अंतर्गत स्वाती मालीवाल यांना अरविंद केजरीवाल यांच्या घरी पाठवण्यात आले. 13 मे रोजी सकाळी स्वाती मालीवाल या षडयंत्रात मुख्यमंत्र्यांवर आरोप लावण्याचा हेतू होता. पण पोलिसांकडे, तिने सांगितले की आज जो व्हिडिओ समोर आला आहे, त्यात त्या आरामात बसलेल्या आहेत आणि पोलिस अधिकाऱ्यांना आणि बिभव कुमार यांना धमकावत आहेत. त्यांचे कपडे फाटलेले नाहीत. किंवा त्यांच्या डोक्याला कोणतीही जखम व्हिडिओमध्ये दिसत नाही, असा दावा आतिशी यांनी केला.

AAP Counters Maliwal : Big allegation by Delhi Miniser Atishi in Maliwal’s Assault Case

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात
    Icon News Hub