केजरीवालांच्या चढलेल्या आणि उतरलेल्या वजनावरून आम आदमी पार्टीने तिहार तुरुंग प्रशासनाशी उकरून काढले भांडण!!


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : दिल्लीच्या दारू घोटाळ्यात तिहार जेलच्या बरॅक नंबर 2 मधल्या कोठडीत बंद असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या चढलेल्या आणि उतरलेल्या वजनावरून आम आदमी पार्टीचे तिहार तुरुंग प्रशासनाशी भांडण जुंपले आहे. AAP clash with Tihar Jail administration over Arvind Kejriwal’s weight gain and loss

अरविंद केजरीवालांना ईडीने ताब्यात घेतले, तेव्हा त्यांचे वजन 69. 5 किलो एवढे होते. आता ते 65 किलो झाले आहे. म्हणजे अवघ्या 12 दिवसांमध्ये त्यांचे वजन 4.50 किलोने घटले आहे, असा दावा केजरीवालांच्या मंत्रिमंडळातील मंत्री आतिशी मार्लेना यांनी केला.

आतिशी यांचा हा दावा तिहार तुरुंग प्रशासनाने फेटाळून लावला. केजरीवालांना कोर्टाच्या आदेशानुसार तिहार तुरुंगात आणले, तेव्हा त्यांचे वजन 65 किलो होते. त्यांना तुरुंगात आणल्या आणल्या दोन डॉक्टरांनी तपासले. तेव्हा त्यांची प्रकृती सर्व निकषांवर व्यवस्थितच होती आणि आजही त्यांची प्रकृती व्यवस्थितच आहे, असे तुरुंग प्रशासनाने स्पष्ट केले.

अरविंद केजरीवाल हे आजही दिल्लीचे मुख्यमंत्री आहेत. तुरुंगातही खुर्चीला चिकटून राहण्याचा त्यांनी अट्टाहास चालवला असून त्यांनी तुरुंगातूनच दिल्ली प्रशासन चालवण्याचा हट्ट सुरू ठेवला आहे. परंतु, तुरुंग प्रशासनाने त्यांच्यावरची कायदेशीर बंधने बिलकुल शिथिल केलेली नाहीत. तिहार तुरुंगातच काय, पण देशातल्या अन्य कुठल्याही तुरुंगात मुख्यमंत्री कार्यालय चालवण्याचे प्रावधान नाही. तुरुंगात तशी सोय उपलब्ध करूनही देता येणार नाही. कारण तसा नियम नाही, असे तुरुंग प्रशासनाने आधीच स्पष्ट केले आहे. पण तरी देखील अरविंद केजरीवालांचा खुर्ची न सोडण्याचा हट्ट कायम आहे.

पण केजरीवालांच्या खुर्चीला चिकटून राहण्याच्या हट्टाकडे जनतेचे दुर्लक्ष व्हावे म्हणून केजरीवालांच्या टीमने त्यांच्या चढलेल्या आणि उतरलेल्या वजनाचा मुद्दा पुढे करून तिहार तुरुंग प्रशासनाशी भांडण मांडले आहे.

AAP clash with Tihar Jail administration over Arvind Kejriwal’s weight gain and loss

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात