विशेष प्रतिनिधी
अमृतसर : पंजाबमध्ये २०२ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पार्टी स्वबळावरच लढणार आहे. कोणत्याही राजकीय पक्षाशी युती करणार नाही, असे पक्षाचे ज्येष्ठ नेते राघव चढ्ढा यांनी सांगितले.Aap will fight on its own in Punjab, not rally with any political party
आपचे पंजाबचे सह-प्रभारी चड्ढा म्हणाले की, आप विधानसभेच्या सर्व विधानसभा ११७ जागा स्वबळावर लढवणार आहे. आपची कोणत्याही पक्षाशी युती होणार नाही.स्वबळावरच लढवून सरकार स्थापन करेल. दरम्यान, मुक्तासर येथील कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरमितसिंग खुडिया चढ्ढा आपच्या पंजाब युनिटचे प्रमुख भगवंत मान यांच्या उपस्थितीत आपमध्ये सामील झाले.
पंजाबमध्ये २०१७ साली झालेल्या निवडणुकीमध्ये आपला २० जागा मिळाल्या होत्या. आपने निवडणुकीपूर्वी सत्तेवर येण्याचा दावा केला होता. काँग्रेस पक्षाला ७७ जागा मिळाल्या होेत्या. अकाली दल व भाजप युतीला जोरदार पराभवाचा सामना करावा लागला. आम आदमी पाटीर्ला देखील अपेक्षित यश मिळाले नव्हते.
पंजाबमध्ये आप आणि अकाली दलाची युती होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, शिरोमणी अकाली दल आणि बहुजन समाज पक्ष सोबत लढणार आहेत. राज्यात ११७ विधानसभा जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत 20 जागांवर बीएसपी आपला उमेदवार देणार आहे. उरलेल्या 97 जागांवर अकाली दलाचे उमेदवार निवडणुकीच्या मैदानात असतील.
मायावती यांनी म्हटले आहे की, पंजाबमधील समाजातील प्रत्येक घटक काँग्रेस पक्षाच्या शासनकाळात इथल्या गरीबी, भ्रष्टाचार आणि बेरोजगारीसारख्या समस्यांशी झुंज देत आहे. यात सर्वाधिक त्रास हा दलित, शेतकरी, युवक आणि महिलांना होत आहे. यासाठी या युतीला विजयी करणं आवश्यक आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App