विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : दिल्ली महापालिकेच्या निवडणुका तोंडावर आल्याने आम आदमी पक्षाने आता तिरंगा फडकावण्याच्या कथित मुद्यावरून राजकारण सुरू केले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे समर्थक तिरंगा फडकावूदेत नसल्याचा आरोप करत गोंधळ माजवून आप आपण राष्ट्रवादी असल्याचे दाखविण्याची धडपड करत आहे.Aam Aadmi Party’s struggle to show Nationalist , accused of not allowing RSS supporters to fly the tricolor
दिल्लीच्या मालवीय नगरातील पार्कमध्ये आरएसएस समर्थक तिरंगा फडकावू देत नाही या कथित आरोपावरून गुरुवारी दिल्ली विधानसभेत आम आदमी पार्टीच्या आमदारांनी विधासभेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरोधात घोषणाबाजी केल्याने सभागृहात तणाव निर्माण झाला होता. या प्रकरणी भाजपच्या एका आमदाराला दिवसभरासाठी निलंबित करण्यात आले.
आपचे आमदार सोमनाथ भारती यांनी हा विषय उपस्थित केला. यावर भाजपचे आमदार आक्रमक झाले. त्यांनी तुकडेतुकडे गँग अशा घोषणा देण्यास सुरुवात केली. हा वाद विकोपाला गेल्याने विधानसभा अध्यक्षांनी मार्शलला बोलावून आमदार विजेंद्र गुप्ता व जितेंद्र महाजन यांना बाहेर काढले. त्यापैकी महाजन यांना दिवसभरासाठी निलंबित केले.
आरएसएस व भाजपचे नेते तिरंगा लावण्यापासून रोखत असतील तर याहून मोठा देशद्रोह कुठला, असा सवाल उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी केला. महापालिकेच्या निवडणुकीत लोकांना सांगण्यासारखे काहीही नसल्याने भाजपचे नेते मुद्दाम समाजामध्ये तणाव निर्माण करून खोटा राष्ट्रवाद लोकांना सांगण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप आपच्या आमदारांनी केला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App