आम आदमी पार्टीचा हिमाचल प्रदेशचा सोशल मीडियाचा अध्यक्षच खलिस्थानवादी असल्याचे उघड झाले आहे. त्याने वेगळ्या खलिस्थानची मागणी करणारे ट्विट व्हायरल झाल्यावर पक्षाने हकालपट्टी केली आहे. परंतु, गेल्या दहा वर्षांपासून सातत्याने खलिस्थानच्या समर्थनार्थ ट्विट करणाऱ्याची सोशल मीडिया अध्यक्ष म्हणून नियुक्तीच कशी केली असा प्रश्न विचारला जात आहे. Aam Aadmi Party’s social media president from Himachal was ousted for being a Khalistani tweet
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : आम आदमी पार्टीचा हिमाचल प्रदेशचा सोशल मीडियाचा अध्यक्षच खलिस्थानवादी असल्याचे उघड झाले आहे. त्याने वेगळ्या खलिस्थानची मागणी करणारे ट्विट व्हायरल झाल्यावर पक्षाने हकालपट्टी केली आहे. परंतु, गेल्या दहा वर्षांपासून सातत्याने खलिस्थानच्या समर्थनार्थ ट्विट करणाऱ्याची सोशल मीडिया अध्यक्ष म्हणून नियुक्तीच कशी केली असा प्रश्न विचारला जात आहे.
हिमाचल प्रदेशचे राज्य सोशल मीडिया अध्यक्ष हरप्रीत सिंग बेदी यांची हकालपट्टी केली आहे. मात्र, हरप्रीतसिंग हा गेल्या दहा वर्षांपासून सातत्याने खलिस्थानच्या समर्थनार्थ ट्विट केले आहे. वेगळ्या खलिस्तानच्या मागणीला त्यांचा घटनात्मक अधिकार देखील असल्याचे त्याने म्हटले होते.
ट्विट व्हायरल झाल्यावर त्याच्यापासून स्वत:ला दूर ठेवण्यासाठी आपने हकालपट्टी केली. हरप्रीत सिंग बेदी यांनी त्यांच्या ट्विटमध्ये व्यक्त केलेली मते आम आदमी पार्टीच्या विचारसरणीच्या विरोधात आहेत. बेदी यांची मते कोणत्याही प्रकारे पक्षाच्या मताचे प्रतिनिधित्व करत नाहीत, असे आपने म्हटले आहे.
आपचा आपल्या महान राष्ट्राच्या एकात्मतेवर आणि अखंडतेवर ठाम विश्वास आहे. कोणीही आपल्या देशाविरुद्ध काहीही लिहिणे कधीही सहन करणार नाही. पक्ष याद्वारे त्यांची तत्काळ प्रभावाने सर्व पदांवरून हकालपट्टी करतो, असेही आपने म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App