विशेष प्रतिनिधी
खांडवा : सार्वजनिक कार्यक्रमात मंत्री आल्यावर त्यांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी झुंबड उडते. त्यात मंत्र्याचा खूप वेळही जातो. त्यामुळे मध्य प्रदेशातील सांस्कृतिक मंत्री उषा ठाकूर यांनी अनोखी शक्कल लढविली आहे. a selfie with a minister, count 100 rupees, a unique offer from Madhya Pradesh Cultural Minister Usha Thakur
आपल्यासोबत सेल्फी घ्यायचा असेल तर शंभर रुपये जमा करावे लागतील असे त्यांनी म्हटले आहे. अर्थात ही सर्व रक्कम पक्षनिधीमध्ये जाणार आहे.खांडवा येथे बोलताना उषा ठाकूर म्हणाल्या, सेल्फी देताना खूप वेळ जातो. त्यामुळे आम्हाला पुढील कार्यक्रमाला जाण्यास उशिर होतो.
त्यामुळे संघटनेच्या दृष्टीने विचार करत असे ठरविले आहे की मंडळ कार्यकारिणीमध्ये जो कोणी सेल्फी घेईल त्याला पक्षाच्या खजिनदाराकडे शंभर रुपयांची रक्कम जमा करावी लागेल. हा निधी पक्षाच्या कामासाठी वापरले जाईल.
उषा ठाकूर म्हणाल्या माझे भाजपाच्या कार्यकर्त्यांना आवाहन आहे की एखाद्याचा सन्मान करताना पुष्पगुच्छ देण्यापेक्षा पुस्तक द्या. हे पुस्तक कोणाला तरी उपयोगी पडेल.उषा ठाकूर या आपल्या अनेक उपक्रमांमुळे आणि वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात. त्यांनी महिला अत्याचाराच्या आरोपींसाठी फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी केली होती.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App