कृष्णशीळेवर बनवलेल्या मूर्तीचे वजन 150 ते 200 किलो
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : अयोध्येतील राम मंदिरासाठी कर्नाटकचे प्रसिद्ध शिल्पकार अरुण योगीराज यांनी बनवलेल्या रामलल्लाच्या मूर्तीची निवड करण्यात आली आहे. श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी सोमवारी (१५ जानेवारी) याला दुजोरा दिला. कृष्णशीळेवर बनवलेल्या मूर्तीचे वजन 150 ते 200 किलो असल्याचे त्यांनी सांगितले.A selection of idols made by Arun Yogiraj for Pranpratistha in Ayodhya
चंपत राय म्हणाले की, अरुण योगीराज यांनी केदारनाथ येथे शंकराचार्यांची आणि इंडिया गेटवर सुभाषचंद्र बोस यांची मूर्ती उभारली आहे. अयोध्येत मूर्ती घडवताना त्यांना पंधरा-पंधरा दिवस मोबाईलपासूनही दूर ठेवण्यात आले होते. त्यांची मूर्ती निवडण्यात आली आहे.
ते म्हणाले की, मंदिरात जी मूर्ती स्थापित केली जाणार आहे ती प्रभू रामाची 5 वर्षे वयाची आहे. राम मंदिरासाठी तीन मूर्तिकारांनी रामललाची मूर्ती बनवली होती. त्यापैकी अरुण योगीराज यांनी साकारलेल्या मूर्तीची निवड करण्यात आली आहे.
जुन्या मूर्तीचे काय होणार?
चंपत राय यांनी सांगितले की, जुनी मूर्ती मंदिराच्या आवारातच राहणार आहे. वास्तविक, इतके दिवस ज्या मूर्तीची पूजा केली जात होती त्याचे काय होणार असा प्रश्न विचारला जात होता.
चंपत राय यांनी सांगितले की, प्राणप्रतिष्ठेची पूजा विधी बुधवारपासून (16 जानेवारी) सुरू होणार असून तो 21 पर्यंत चालणार आहे. 22 जानेवारीला गाभाऱ्यात मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. 12 वाजल्यापासून सुरू होणारी प्राणप्रतिष्ठा 1 वाजेपर्यंत पूर्ण होईल. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख डॉ. मोहन भागवत आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे सर्व मान्यवर आपल्या भावना व्यक्त करतील.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App