
वृत्तसंस्था
नवी दिल्ली / पाटणा : पेगासस स्पायवेअरवरून हेरगिरी करण्याच्या विरोधी पक्षांच्या आरोपाला बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बळ दिले आहे. भाजपबरोबर केंद्रात आणि बिहारमध्ये सत्तेत राहून नितीश कुमार यांनी विरोधी पक्षंच्या सुरात सूर मिसळला आहे. A probe should be done, indeed. We have been hearing about telephone tapping for so many days, the matter should be discussed (in Parliament).
पेगाससच्या मुद्द्यावरून काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांनी संसदेचे कामकाज गदारोळ करून आठवडाभर बंद पाडले. पेगासस या मुद्द्यावर विरोधकांना हवी तशी उत्तरे मोदी सरकार देत नाही. त्यामुळे विरोधकांनी संसद बंद पाडण्याचा पवित्रा घेतला आहे. अभिरूप संसद भरविण्याचा देखील विरोधकांचा मनसुबा आहे.
A probe should be done, indeed. We have been hearing about telephone tapping for so many days, the matter should be discussed (in Parliament). People (Opposition) have been reiterating (for talks) for so many days, it should be done: Bihar CM Nitish Kumar pic.twitter.com/LeNCddsyd8
— ANI (@ANI) August 2, 2021
या पार्श्वभूमीवर नितीश कुमार यांनी भाजप बरोबर सत्तेत राहून देखील विरोधी पक्षांच्या मागणीला पाठिंबा दिला आहे. ते म्हणाले की, गेले कित्येक दिवस आपण पेगासस हेरगिरी बद्दल ऐकतो आहोत. या विषयावर संसदेत चर्चा करायला हवी. या प्रकरणाची चौकशीही व्हायला हरकत नाही. चौकशीतून जे काही पुढे येईल ते सगळ्यांनी स्वीकारावे.
नितीश कुमार यांनी पेगाससच्या मुद्द्यावरून विरोधकांच्या सुरात सूर मिसळणे याची ही पहिलीच वेळ नाही त्यांनी हळूहळू एनडीए विरोधात आपला आवाज मजबूत करण्याचा मनसुबा रचल्याचे दिसते. त्यांच्या पंतप्रधानपदाचे चर्चा जेडीयूने सुरु केली आहे. त्यांनी मोदी सरकारचे टीकाकार हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओम प्रकाश चौटाला यांचीही भेट घेतली आहे. त्यानंतर आज पेगाससच्या मुद्द्यावर नितीश कुमार यांनी विरोधी पक्षांच्या चौकशीच्या मागणीला पाठिंबा दिला आहे. यातून ते भाजपप्रणीत एनडीए पासून दूर चाललेत काय?, असा सवाल उपस्थित होतो आहे.
A probe should be done, indeed. We have been hearing about telephone tapping for so many days, the matter should be discussed (in Parliament).
महत्त्वाच्या बातम्या
- लस घेणाऱ्या नागरिकांना रोख डॉलर्स तर कुठे चक्क मोटार किंवा गायीचे बक्षीस
- लोकवर्गणीतून १६ कोटी रुपये जमवून इंजेक्शन दिलेली चिमुकल्या वेदीकाचा मृत्यू
- सत्तेवर असताना काँग्रेस होती हेरगिरीतील जेम्स बॉँड, पेगासिस स्पायवेअर प्रकरणा मुख्तार अब्बास नक्वी यांचा पलटवार
- पुरग्रस्त भागासाठी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना लिहिले पत्र, मोबाईलवर काढलेले फोटोही पंचनामे म्हणून ग्राह्य धरा