या सुविधांचा फायदा शेतकऱ्यांना होणार असून राज्यात उद्योग, पर्यटन आणि गुंतवणूक येणार आहे
विशेष प्रतिनिधी
यवतमाळ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यवतमाळ मध्ये 35,000 कोटींच्या विविध विकास प्रकल्पांचे आणि योजनांचे शुभारंभ, अनावरण, राष्ट्राला समर्पण आणि लाभाचे वितरण बुधवारी केले. यामध्ये 4900 कोटींहून अधिक किमतीचे रेल्वे, रस्ते, सिंचन आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांचा समावेश आहे. केंद्राने ‘बळीराजा जलसंजीवनी योजना’ अंतर्गत विदर्भातील 91 सिंचन प्रकल्पांसाठी 13,500 कोटी वितरीत केले.या कार्यक्रमाला राज्यपाल रमेश बैस , मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री, लोकप्रतिनिधी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.A modern strong and developed Maharashtra will complete the resolution of a developed India Devendra Fadnavis
मोदीजींच्या विकसित भारताच्या संकल्पनेला पूर्ण करण्यासाठी योजना आणि प्रकल्पांचे शुभारंभ, अनावरण, राष्ट्राला समर्पण आणि लाभाचे वितरण:
राष्ट्राला समर्पण
अनावरण
शुभारंभ
निधी वितरण
वितरण
केंद्र आणि राज्य सरकार मिळून महिला, शेतकरी, युवा आणि गरिबांना सुखी, समृद्ध आणि सक्षम बनवण्याचा प्रयत्न करत आहेत. रस्ते, रेल्वे, हवाई कनेक्टिव्हिटी, वीज, पाणी सुविधा आणि आधुनिक पायाभूत सुविधांमुळे विकसित महाराष्ट्राचा पाया मजबूत होईल. या सुविधांचा फायदा शेतकऱ्यांना होणार असून राज्यात उद्योग, पर्यटन आणि गुंतवणूक येणार. त्यामुळे अधिकाधिक रोजगाराच्या संधी निर्माण होतील.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App