Manipur : 5 पिस्तूल, 10 ग्रेनेड, बुलेटप्रूफ जॅकेट आणि बरंच..; मणिपूरमध्ये मोठा शस्त्र साठा जप्त!

Manipur

शस्त्र जप्त केल्यानंतर आसाम रायफल्सने संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली


विशेष प्रतिनिधी

इंफाळ : मणिपूरच्या ( Manipur ) पूर्व इंफाळ जिल्ह्यातील सेकता अवांग लीकाई भागात शोध मोहिमेदरम्यान शस्त्रास्त्रांचा साठा जप्त करण्यात आला आहे. एका निवेदनात म्हटले आहे की, परिसरात शोध मोहिमेदरम्यान तीन इन्सास रायफल, दोन एके-56 रायफल, मॅगझिन, दारूगोळा आणि लष्करी गणवेश आणि इतर अनेक वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत.

इंफाळ पश्चिम जिल्ह्यातील लेकिंथाबी भागात काही बंदूकधाऱ्यांनी पोलिसांकडून तीन रायफल आणि दारूगोळा हिसकावून घेतल्याचा आरोप आहे. पोलिसांकडून शस्त्रे हिसकावून घेतल्याच्या घटनेनंतर ही शोध मोहीम सुरू करण्यात आली होती.

 

या घटनेप्रकरणी चार पोलीस कर्मचारी आणि एका व्यक्तीला अटक करण्यात आल्याचे पोलीस निवेदनात म्हटले आहे. न्यायालयाने त्यांना दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सुरक्षा दलांनी मणिपूरच्या टेकडी आणि खोऱ्यातील जिल्ह्यांच्या सीमा आणि संवेदनशील भागात शोध मोहीम राबवली आणि काकचिंगमधील वाबगई नेतेखोंग येथून शस्त्रे आणि दारूगोळा जप्त केला, असे त्यात म्हटले आहे.

शस्त्र जप्त केल्यानंतर आसाम रायफल्सने संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली. आसाम रायफलच्या पोस्टमध्ये लिहिले. “आसाम रायफल्सने मणिपूरमध्ये शस्त्रे आणि दारुगोळा जप्त केला. आसाम रायफल्सने भारतीय लष्कर, बीएसएफ आणि मणिपूर पोलिसांनी एक स्टेन मशीन गन, दोन 9 मिमी पिस्तूल, दोन सिंगल बॅरल गन, दहा ग्रेनेड, दारूगोळा आणि युद्ध साहित्य जप्त केले.”

“शोध मोहिमेदरम्यान पाच बंदुका, 10 ग्रेनेड्स, एक बुलेटप्रूफ जॅकेट आणि एक वायरलेस सेट जप्त करण्यात आला आहे,” असे पोलिसांच्या निवेदनात म्हटले आहे.

A large stockpile of weapons seized in Manipur

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात