जाणून घ्या, हा शेतकरी कोण आहे आणि कशाप्रकारे नफा मिळाला
विशेष प्रतिनिधी
विशाखापट्टणम : देशात टोमॅटोचे भाव गगनाला भिडले असून ते उतरण्याचे नाव घेत नाहीत. दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला मोठा फटका बसत असतानाच दुसरीकडे काही शेतकऱ्यांची मात्र चांदी होत आहे. असाच काहीसा प्रकार आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यात या शेतकऱ्यासोबत घडला आहे. येथील एका शेतकरी कुटुंबाने अवघ्या महिनाभरात तब्बल ३ कोटी रुपये कमावले आहे. A farmer in Andhra Pradesh made a profit of Rs 3 crore just by selling tomatoes
टोमॅटोची ही कहाणी चित्तूरचे शेतकरी पी चंद्रमौली आणि त्यांचा भाऊ मुरली यांची आहे. हे दोन्ही शेतकरी बांधव चित्तूर जिल्ह्यातील सोमाला मंडलातील करकमंडा गावचे रहिवासी आहेत. त्यांचे कुटुंब सुरुवातीपासून टोमॅटोची लागवड करत आहे. हे शेतकरी कुटुंबही शेतीत नवनवीन तंत्र वापरत आहे. यावेळी टोमॅटोच्या शेतीला चांगला भाव मिळू शकतो, असा अंदाज शेतकरी चंद्रमौली यांनी पूर्वी व्यक्त केला होता. जून-जुलैचा अंदाज घेऊन त्यांनी टोमॅटोची चांगली लागवड केली होती. त्याचा चांगला परिणाम त्यांना मिळाला आणि कमाई कोटींवर पोहोचली.
टोमॅटोच्या भाववाढीचा परिणाम म्हणजे चंद्रमौली यांना चार कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले. ‘टाइम्स ऑफ इंडिया’मधील बातमीत असे म्हटले आहे की चंद्रमौली यांना टोमॅटोची लागवड आणि वाहतूक इत्यादींवर एक कोटी रुपये खर्च करावे लागले. अशा प्रकारे त्यांना तीन कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. चंद्रमौली यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी सुरुवातीला कर्नाटकातील कोलार येथे त्यांचे उत्पादन विकले. 15 किलोच्या क्रेटसाठी त्यांना 1000 ते 1500 रुपये मिळाले. गेल्या काही आठवड्यांत चंद्रमौली यांनी 40,000 टोमॅटोच्या पेट्या विकल्या असून, त्यांना 4 कोटी रुपयांची कमाई झाली आहे.
चंद्रमौली यांच्या कुटुंबाकडे 12 एकर जमीन आहे ज्यात शेती केली जाते. एवढी जमीन फक्त करकमांडा गावात आहे तर या कुटुंबाकडे सुवरापुव्रीपल्लीत २० एकर जमीन आहे. टोमॅटोचे चांगले उत्पादन घेण्यासाठी त्यांनी ठिबक सिंचन आणि मल्चिंगचा वापर केल्याचे चंद्रमौली सांगतात. त्यामुळे त्यांना टोमॅटोचे चांगले उत्पादन मिळून त्यांचे उत्पन्नही वाढले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App