कारगिल विजय दिनानिमित्त लडाखमधील त्रिशूल युद्ध स्मारकाच्या दर्जा उन्नतीसाठी शिंदे – फडणवीस सरकारचे 3 कोटी रुपये!!


प्रतिनिधी

मुंबई : कारगिल विजय दिनानिमित्त लडाख येथील त्रिशूल युद्ध स्मारकाच्या दर्जा उन्नतीसाठी ३ कोटी रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारतीय सैन्य दलाला सुपूर्द केला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हेदेखील उपस्थित होते. Status of Trishul War Memorial in Ladakh on Kargil Victory Day

कारगिल विजयोत्सवाला २४ वर्षे पूर्ण झाली असून या युद्धात राज्यातील २५ जवान शहीद झाले होते. याच भावनेतून लडाख येथील त्रिशूल स्मारकासाठी मदत दिली असल्याची भावना यावेळी व्यक्त केली. महाराष्ट्र ही छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी असून शौर्याला वंदन करण्याची शिकवण या मातीने आपल्याला दिलेली आहे. सैन्य दलाला निधी देणे हे शासनाचे कर्तव्य असून ही आम्हा सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट असल्याचे मुख्यमंत्री यांनी यावेळी सांगितले.

याप्रसंगी लेफ्टनंट जनरल एच. एस. केहलोन, ब्रिगेडियर आचलेश शंकर, लेफ्टनंट कर्नल एस. के. सिंह, जिल्हा सैनिक वेलफेअर बोर्डाचे मेजर प्रांजल जाधव आणि सैनिक कल्याण विभागाचे संचालक ब्रिगेडियर राजेश गायकवाड हे उपस्थित होते.

Status of Trishul War Memorial in Ladakh on Kargil Victory Day

महत्वाच्या बातम्या 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात