विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर सुरवातीला शरदनिष्ठ विरुद्ध अजितनिष्ठ संघर्ष झाला. पण सत्तेच्या बळावर अजितनिष्ठांचा जोर वाढल्याचे पाहून शरदनिष्ठा गटाने तलवार म्यान केली. गेले काही दिवस शरदनिष्ठ गटाकडून अजितनिष्ठ गटावर कोणतेही आरोप होत नाहीत. उलट विधिमंडळ अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शरदनिष्ठ गट हळूहळू अजितनिष्ठ गटाकडे सरकत असल्याचे चित्र दिसत आहे. या पार्श्वभूमीवर शरदनिष्ठ गटाला थेट केंद्रीय निवडणूक आयोगाची नोटीस आली आहे. Election commission issues notice to sharad pawar faction, may expose his double game
अजितदादांची चलाखी
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कूट पडण्यापूर्वी अजित पवारांनी राजकीय चलाखी करत 30 जून रोजीच निवडणूक आयोगाकडे आपणच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख आहोत आणि आपला गट हीच खरी राष्ट्रवादी काँग्रेस आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ चिन्ह आणि पक्ष म्हणून अधिकृत मान्यता आपल्यालाच मिळाली पाहिजे, असा अर्ज केला होता. त्यानंतर 2 दिवसांनी 2 जुलै 2023 रोजी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडत शरद पवारांना विरुद्ध बंड करून उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर साधारण आठवडाभर शरदनिष्ठ विरुद्ध अजितनिष्ठ असा राजकीय सामना रंगला. शरद पवारांनी यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीवर जाऊन पुन्हा एकदा पक्ष बांधणी करण्याची घोषणा केली. त्यांनी छगन भुजबळांचा मतदारसंघ येवल्याचा दौरा देखील केला. त्यामुळे शरदनिष्ठ गटामध्ये चैतन्य पसरले.
निधी वाटपामुळे अजितनिष्ठ गट वरचढ
पण दरम्यानच्या काळात बऱ्याच राजकीय घडामोडी घडल्या आणि शरदनिष्ठ गटाचा कलच अजितनिष्ठ गटाकडे दिसू लागला. विधिमंडळ अधिवेशन सुरू झाल्यानंतर अजित पवारांनी 45000 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मांडल्या. त्याचवेळी त्यांनी सर्वपक्षीय आमदारांना शिंदे – फडणवीस यांच्या नियंत्रणाखाली निधी वाटला. त्यामुळे शरदनिष्ठ गटाचा कल अजितनिष्ठ गटाकडे वाढला. गेल्या साधारण 15 ते 20 दिवसांमध्ये शरदनिष्ठ गटाने अजितनिष्ठ गटाविरुद्धची आपली तलवार म्यान करून टाकली.
त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खरी फूट पडली आहे किंवा नाही, शरद पवारांनीच अजित पवारांना सत्तेच्या वळचणीला पाठवून दिले वगैरे राजकीय गप्पा महाराष्ट्रात रंगल्या. शरद पवारांचीच ही “डबल गेम” आहे, असे अनेक अनुभवी जाणकार बोलू लागले. पण आता पवारांची ही “डबल गेम” कायदेशीर कसोटीवर एक्सपोज होण्याची वेळ आली आहे. कारण केंद्रीय निवडणूक आयोगाने खरी राष्ट्रवादी कुणाची याचा निर्णय घेण्यासाठी शरदनिष्ठ गटाला अजितनिष्ठ गटाच्या 30 जूनच्या अर्जावरून आपले म्हणणे मांडण्यासाठी नोटीस पाठवली आहे.
“डबल गेम” एक्सपोझ होण्याचा धोका
शरद पवारांना या संदर्भात आता निवडणूक आयोगाला आपली अधिकृत भूमिका कळवावीच लागेल. त्याशिवाय निवडणूक आयोग निर्णय घेणार नाही. त्यामुळे शरद पवारांना “डबल गेम” खेळण्याऐवजी आता कायदेशीर कसोटीवर खरी राष्ट्रवादी कोणाची??, या विषयावर अधिकृत भूमिका घ्यावी लागेल आणि निवडणूक आयोगाच्या नोटिशीला उत्तर द्यावे लागेल. पण त्यामुळे पवारांना “डबल गेम” एक्सपोज होण्याचा धोका वाटतो आहे. त्यामुळे आता पवार अधिकृत पातळीवर कोणती भूमिका घेणार??, उरलेली राष्ट्रवादी घेऊन ते भाजपच्या वळचणीला जाणार का??, याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App