पावसामुळे झालेल्या गाळात जेसीबी चालू शकली नाही.दरम्यान ग्रामस्थांच्या मदतीने या गव्यास रस्सी ओढून बाहेर काढण्यात यश आले.A cow stuck in the mud at Harapwade in Dhamanikhora got life donation
विशेष प्रतिनिधी
पन्हाळा : धामणीखोऱ्यातील हरपवडे (ता.पन्हाळा)येथे यावर्षी झालेल्या अतिवृष्टीत डोंगर खचून गुरवाचा नाळवा नावाचे शेत गाळाने गाढले आहे. दरम्यान याच शेतात शनिवारी पहाटे मादी गवा रेडी अन्नाच्या शोधात असताना गाळात अडकली असल्याचे ग्रामस्थांनी पाहिले.दरम्यान ग्रामस्थांनी तातडीने याबाबतची माहिती वन विभागाला दिली.
ही माहिती मिळताच बाजार भोगाव वन परीक्षेत्र पणुत्रे बीटचे वनपाल नाथा पाटील पथकासह घटनास्थळी पोहचले.या गवा मादीस गाळातून बाहेर काढण्यासाठी जेसीबी मशीनद्वारे प्रयत्न करण्यात आला. पण पावसामुळे झालेल्या गाळात जेसीबी चालू शकली नाही.
दरम्यान ग्रामस्थांच्या मदतीने या गव्यास रस्सी ओढून बाहेर काढण्यात यश आले.वनविभाग कर्मचारी व ग्रामस्थांनी शर्तीचे प्रयत्न करत या गव्याला गाळातून बाहेर काढत जीवदान दिले.तसेच या गव्यावर उपचार सुरू आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App