20 ते 25 जण जखमी झाले असून त्यापैकी पाच जणांची प्रकृती चिंताजनक A bus full of tourists fell into a pit in Surat Gujarat two children died
विशेष प्रतिनिधी
सुरत : गुजरातमधील सुरतहून सापुतारा येथे जाणारी खासगी लक्झरी बस खड्ड्यात पडली. रविवारी झालेल्या या अपघातात दोन मुलांचा जागीच मृत्यू झाला आणि 20 ते 25 जण जखमी झाले असून त्यापैकी पाच जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सापुतारा मालेगाम रोडवर हा अपघात झाला. जीजे 05 डीटी 9393 क्रमांकाची खासगी बस खड्ड्यात पडली. ही बस प्रवाशांसह सुरतहून सापुताऱ्याकडे जात होती.
ही बस सापुतारा येथे फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांना घेऊन जात होती. या अपघातात दोन मुलांचा जागीच मृत्यू झाला. पाच जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. एकूण 20 ते 25 जण जखमी झाले असून त्यांच्यावर शामगव्हाण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
बसमध्ये 50 ते 60 जण होते, असे सांगण्यात येत आहे. या अपघातात 8 ते 10 वर्षे वयोगटातील एक मुलगी आणि एका मुलाचा मृत्यू झाला. घटनास्थळी स्थानिक प्रशासन आणि अग्निशमन दलाचे पथक बचावकार्य सुरू होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App