विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : गेल्या दशकभराच्या काळामध्ये केंद्रीय राखीव पोलिस दल (सीआरपीएफ) आणि सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) ८१ हजारांपेक्षाही अधिक कर्मचाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. एकट्या २०१७ या वर्षांत अकरा हजारांपेक्षाही अधिक कर्मचाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतल्याची बाब समोर आली आहे. 81 thousand jawans took VRS
केंद्रीय गृहमंत्रालयाने याबाबतचा डेटा प्रसिद्ध केला असून २०११ ते २०२० या काळामध्ये १५ हजार ९०४ कर्मचाऱ्यांनी निमलष्करी दलातील सेवेचा राजीनामा दिला असून एकट्या २०१३ मध्ये २ हजार ३३२ लोकांनी ही सेवा सोडल्याची बाब उघड झाली आहे.
सीआरपीएफ, बीएसएफ, आयटीबीपी (भारत-तिबेट सीमा पोलिस), एसएसबी (सशस्त्र सीमा बल), सीआयएसएफ (केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल) आणि आसाम रायफल्स या सहा निमलष्करी दलांचा यासाठी अभ्यास करण्यात आला होता.
यातील बऱ्याच मंडळींनी कौटुंबिक, आरोग्य समस्या आणि अन्य क्षेत्रात करिअरच्या मिळालेल्या चांगल्या संधी यामुळे एक तर स्वेच्छानिवृत्ती घेतली किंवा या सेवेचा त्याग केल्याचे दिसून आले असल्याचे मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App