नक्षलवादी संघटनेचा बडा नेता आणि कम्युनिस्ट पार्टी इंडियाच्या (माओवादी) सर्वोच्च समजल्या जाणाºया पॉलिट ब्युरोचा सदस्य प्रशांत बोस उर्फ किशनदा याला पोलीसांनी जेरबंद केले आहे. त्याच्यावर एक कोटी रुपयांचे इनाम होते. मात्र, तरीही कित्येक वर्षांपासून पोलीसांना गुंगारा देत होता. एवढेच नव्हे तर आजारी असलेला बोस कोलकत्ता येथे जाऊन उपचारही करून घेत होता.80-year-old Naxalite leader Kishanda arrested along with his wife.
विशेष प्रतिनिधी
रांची : नक्षलवादी संघटनेचा बडा नेता आणि कम्युनिस्ट पार्टी इंडियाच्या (माओवादी) सर्वोच्च समजल्या जाणाºया पॉलिट ब्युरोचा सदस्य प्रशांत बोस उर्फ किशनदा याला पोलीसांनी जेरबंद केले आहे. त्याच्यावर एक कोटी रुपयांचे इनाम होते. मात्र, तरीही कित्येक वर्षांपासून पोलीसांना गुंगारा देत होता. एवढेच नव्हे तर आजारी असलेला बोस कोलकत्ता येथे जाऊन उपचारही करून घेत होता.
किशनदा याच्यासोबत त्याची पत्नी शीला मरांडीलाही पोलीसांनी अटक केली आहे. शीला मरांडी माओवादी फ्रंटल ऑर्गनायझेशनच्या नारी मुक्ती संघाची प्रमुख आहे. किशनदा हा आजारी असला तरी संघटनेत सक्रीय होता. अनेक नक्षलवादी हल्ले घडविले होते. झारखंडमध्ये त्याच्यावर ७० गुन्हे दाखल आहेत. झारखंड सरकारने त्याच्यावर एक कोटी रुपयांचे इनाम ठेवले होते.
मुळचा पश्चिम बंगालमधील जाधवपूर येथील असलेल्या किशनदाचा एकेकाळी पश्चिम बंगाल, झारखंड, ओडिशा या भागात प्रचंड प्रभाव होता. अनेक नक्षलवादी हल्यांचा तो मास्टरमाईंड होता. बूढा या नावानेही तो ओळखला जाई. मात्र, अडीच वर्षांपूर्वी त्याला पक्षाघाताचा झटका आला. त्यामुळे त्याला चालतातही येत नव्हते. तरीदेखील नक्षलवाद्यांनी त्याच्या उपचाराची व्यवस्था केली होती. पश्चिम सिंहभूम जिल्हा आणि ओडिशा यांच्यामध्ये असलेले जंगल हे नक्षलवाद्यांनी आझाद क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. तेथे त्यांचेच राज्य चालते असे म्हणतात. सुरक्षेसाठी किशनदाला याच ठिकाणी आणले होते. मात्र, सशस्त्र पहाऱ्यात त्याला उपचारासाठी कोलकत्ता येथेही घेऊन जात होते.
इंटेलिजन्स ब्युरोने झारखंड पोलीसांना किशनदाच्या हालचालींची माहिती दिली होती. त्यामुळे पारसनाथ येथून सरायकेला येथील जंगलात स्कॉर्पिओ गाडीतून परतत असताना किशनदा, त्याची पत्नी शीला आणि त्याच्या शरीररक्षकाला अटक करण्यात आली.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App