विशेष प्रतिनिधी
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या डबल गेमचा पुढचा अंक आज सादर झाला. ज्या आधारे शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय दर्जा टिकवून ठेवण्याचा प्रयत्न केला होता, तो आधारही आज तुटला. कारण नागालँड मधल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वच्या सर्व 7 आमदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवारांना पाठिंबा दिला आहे. 7 NCP MLAs in Nagaland support Ajit pawar
शरद पवारांनी काही दिवसांपूर्वी खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांची कार्यकारी अध्यक्ष पदी नेमणूक करताना नवी दिल्लीत घेतलेल्या बैठकीत याच 7 आमदारांचा सत्कार केला होता. सत्काराच्या त्या राजकीय खेळीतून शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस हा राष्ट्रीय पातळीवरचा पक्ष आहे, हे दाखविण्याचा प्रयत्न केला होता. पण आता या प्रयत्नांनाच त्या आमदारांनी खोडा घालत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. नागालँड मधले एक – दोन नव्हे, तर सर्वच्या सर्व 7 आमदार अजित पवारांच्या राष्ट्रवादीत आल्याने तिथल्या राष्ट्रवादीत फूट पडली नसून अख्खी राष्ट्रवादीच अजित पवारांच्या राष्ट्रवादीत विलीन झाली आहे.
अजित पवार गटाने निवडणूक आयोगात आपणच राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचा दावा केला आहे. तसंच पक्षाने आपली पक्षाचा अध्यक्ष म्हणून नेमणूक केल्याचंही निवडणूक आयोगाला सांगितले आहे. नागालँड मधला अख्खा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवारांना सामील झाल्यामुळे अजितदादांचा पक्षावरचा दावा मजबूत झाला आहे.
https://twitter.com/NCPSpeaks1/status/1681992720775286785?s=20
राष्ट्रवादीचा एनडीपीपी-भाजपला पाठिंबा
नागालँडमध्ये वर्षाच्या सुरूवातीला झालेल्या निवडणुकांमध्ये एनडीपीपी-भाजप युतीला 37 जागांसह स्पष्ट बहुमत मिळालं होतं. एनडीपीपीला 25 आणि भाजपला 12 जागांवर यश मिळालं. नागालँडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने एनडीपीपी-भाजपला स्पष्ट बहुमत असतानाही त्यांना पाठिंबा द्यायचा निर्णय घेतला. नागालँडमध्ये राष्ट्रवादीचे 7 आमदार निवडून आले. या 7 आमदारांनीच आता अजित पवारांसोबत जायचा निर्णय घेतला आहे.
नागालँडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबत एकत्र का आलं? याचं कारण शरद पवारांनी तेव्हा सांगितलं होतं. ‘निकाल लागल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे 7 विधानसभा सदस्य निवडून आले. निवडणुकीच्या काळात तिथल्या मुख्यमंत्र्यांना आमचा पाठिंबा होता. आमचा पाठिंबा त्या ठिकाणच्या मुख्यमंत्र्यांना आहे, त्यामुळे भाजपसोबत आम्ही युती केलेली नाही, असे शरद पवार म्हणाले होते.
‘आमचं अंडरस्टॅण्टिंग त्या ठिकाणच्या मुख्यमंत्र्यांशी आहे. नागालँडचं एकंदरीत चित्र बघितल्यानंतर त्याठिकाणी एक प्रकारची स्थिरता येण्यासाठी आमची मदत त्या ठिकाणच्या मुख्यमंत्र्यांना होत असेल तर आमचा त्यांना पाठिंबा आहे, पण भाजप म्हणून नाही,’ असे पवारांनी स्पष्ट केले होते.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App