मराठी चिरतरुण रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या गारवा या अल्बमला 25 वर्षे पूर्ण


अभिनेत्री सोनाली कुलकर्णी मृत्यू दिग्दर्शिका फुलवा कामकाजा भन्नाट डान्स व्हायरल. Milind ingle Garava album celebrate the 25 years!!

विशेष प्रतिनिधी

पुणे :  90 च्या दशकात तरुण प्रेक्षकाला मराठी संगीताकडे वळवणारा, मराठी संगीताची मराठी गाण्याची भुरळ तरुण मनावर घालणारा मिलिंद इंगळे यांनी गायलेला. गारवा हा 90 च्या दशकातील प्रत्येकाच्या आजही तितकाच लक्षात आहे.
अल्बम मधल्या अनेक गाण्यांशी अनेकांच्या अनेक आठवणी जोडल्या आहेत .

90 च्या दशकात प्रेमात पडणाऱ्या आणि ब्रेकअप झालेल्या प्रत्येकाने गारवा हा अल्बम नक्कीच ऐकलाय . तू आज प्रत्येकाच्या तितक्याच जवळ आहे. पहिला पाऊस झाल्यावर आजही मराठी घरात एकदा तरी गारवाची गाणी ऐकली जातात . अशातच हा लाडका गारवा अल्बम पंचवीस वर्षे पूर्ण करतोय त्यानिमित्ताने मराठी चित्रपट विश्वातील अनेक सेलिब्रिटी या गाण्यावर धुंद पावसात डान्स करत. गारवाची 25 वर्ष पूर्ण करतातयेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Milind Ingale (@miilindingale)

गारवा’ला २५ वर्ष पुर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने सोनाली कुलकर्णी – फुलवा खामकर यांनी भर पावसात गारवा डान्स केलाय. गारवाला २५ वर्ष पुर्ण झाल्यानिमित्ताने सोनाली – फुलवाने गारवाच्या ओळींवर सुंदर डान्स केलाय. या दोघींच्या गारवा डान्सला प्रेक्षकांनी पसंती दिलीय. याशिवाय लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केलाय.

कुठे केलाय डान्स आणि काय म्हणाली सोनाली?सोनाली – फुलवाने शिवाजी पार्कला समुद्राच्या ठिकाणी जी नवीन जागा बांधलीय तिथे डान्स केलाय. या व्हिडीओत मागे बांद्रा – वरळी सी लिंक दिसतंय. याशिवाय फेसाळणारा आणि उधाळणारा समुद्र दिसतोय. हा व्हिडीओ शेअर करत सोनाली म्हणाली.. या गाण्याच्या, अल्बमच्या गेली अनेक वर्ष प्रेमात आहोत…

त्याचा गारवा आजही, तसाच जाणवतो, ताज़ा ताज़ा… थंडगार, आजही मनात गुदगुल्या होतात, अंगावर शहारे येतात… या गाण्यांवर नाचत, गात, आज अनेक पावसाळे अनुभवलो, जगलो …आज “गारवा” ला २५ वर्ष पूर्ण होत आहेत, या निमित्ताने आमच्याकडून हे एक छोटंसं.. अशा भावना सोनालीने व्यक्त केल्या.

Milind ingle Garava album celebrate the 25 years!!

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात