69th National Film Awards 2023 : दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाल्यावर ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रहमान झाल्या भावूक

कार्यक्रमाला उपस्थित सर्व कलाकार आणि पाहुण्यांनी त्यांना उभा राहून दाद दिली.

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत आज ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या वर्षी अनेक कलाकारांना त्यांच्या सिनेमातील उत्कृष्ट अभिनयासाठी सन्मानित करण्यात आले आहे. तसेच चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठा पुरस्कार दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रहमान यांना प्रदान करण्यात आला आहे. 69th National Film Awards 2023 Veteran actress Waheeda Rahman gets emotional after receiving the Dadasaheb Phalke Award

८० च्या दशकातील गोल्डन टाईम अभिनेत्री, वहिदा रहमान यांना आज या वर्षीच्या दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. यावेळी त्या खूपच भावूक झाल्या होत्या. वहिदा रेहमान यांच्या नावाची घोषणा होताच त्यांच्या डोळ्यात पाणी आले. कार्यक्रमाला उपस्थित सर्व कलाकार आणि पाहुण्यांनी त्यांना उभा राहून दाद दिली.

८५ वर्षीय वहिदा रहमान आपल्या काळातील सर्वात ग्लॅमरस अभिनेत्री राहिली आहे. त्यांच्या अभिनयाने लोक प्रभावित झाले. वहिदा यांनी 90 हून अधिक चित्रपटांमध्ये अभिनय आणि नृत्य कौशल्य दाखवले आहे. छोट्या भूमिकांमध्येही त्यांनी उत्कृष्ट अभिनय केला आहे.

पांढऱ्या रंगाची हेवी एम्ब्रॉयडरी साडी परिधान करून त्यांनी राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली होती.  पुरस्कार जाहीर होण्यापूर्वी त्यांच्या चित्रपटसृष्टीतील अभूतपूर्व योगदानाचे कौतुक करण्यात आले. यावेळी त्या भावूक झाल्या होत्या. उपस्थित सर्व कलाकारांनी उभे राहून त्यांना दाद दिली.

69th National Film Awards 2023 Veteran actress Waheeda Rahman gets emotional after receiving the Dadasaheb Phalke Award

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात