विशेष प्रतिनिधी
लखनऊ : मातृभूमीच्या ओढीने १९७० मध्ये भारतात आलेल्या ६३ हिंदू बंगाली कुटुंबियांना हक्काचा निवारा मिळाला आहे. उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने या कुटुंबांना ही भेट दिली आहे. त्यांचे उत्तर प्रदेशात पुनर्वसन करण्यात येणार आहे.63 Hindu Bengali families who came to India in 1970 due to motherland cravings get right shelter, rehabilitation will be done in Uttar Pradesh
या निर्वासित ६३ हिंदू बंगाली कुटुंबांचं उत्तर प्रदेशातील कानपूर ग्रामीण भागात पुनर्वसन करण्यात येईल. शेतीसाठी त्यांना दोन – दोन एकर जमीन तसंच घर बनवण्यासाठी २०० स्क्वेअर फूट जमीन कानपूरमध्ये उपलब्ध करून दिली जाणार आहे. तसंच या जमिनीवर घर उभारण्यासाठी मुख्यमंत्री आवास योजनेतून १.२० लाख रुपयेही या कुटुंबांना दिले जाणार आहेत.
उत्तर प्रदेश सरकारने या निर्वासित कुटुंबांसाठी कानपूर ग्रामीण भागात १२१.४१ हेक्टर जमीन पुनर्वास योजनेसाठी राखून ठेवलीय. या जमिनीवर भूमी सुधार आणि सिंचन सुविधा यांसारखे कार्यक्रम राबवण्याचंही आश्वासन योगी सरकारकडून देण्यात आलंय. या कुटुंबांना शेती आणि घरासाठी उपलब्ध करून देण्यात येणारी जमीन एक रुपया लीजवर ३० वर्षांसाठी देण्यात येईल. हा करार दोन वेळा ३० – ३० अर्थात एकूण ९० वर्षांसाठी नुतनीकरण करता येईल.
१९७० मध्ये पूर्व पाकिस्तानातून ६५ बंगाली निर्वासित कुटुंब उत्तर प्रदेशात दाखल झाले होते. या कुटुंबांना हस्तिनापूर मेरठमधील ‘मदन कॉटन मिल’मध्ये रोजगार देऊन मध्ये तात्पुरत्या स्वरुपात पुनर्वसित करण्यात आलं होतं.
परंतु, ही मिल ८ ऑगस्ट १९८४ मध्ये बंद पडली. त्यामुळे पुन्हा एकदा या निर्वासित कुटुंबांवर बेघर होण्याचं संकट कोसळलं. यातील दोन कुटुंबातील सर्व सदस्यांचा मृत्यू झाला आहे. तर उर्वरीत ६३ कुटुंब १९८४ पासून पुनर्वसनाच्या प्रतिक्षेत होते.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App