तेलंगणात काँग्रेसच्या 6 गॅरंटी, 200 युनिट वीज मोफत; शेतकऱ्यांना 15 हजार, विद्यार्थी-बेघरांना 5 लाख देणार

वृत्तसंस्था

हैदराबाद : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी शुक्रवारी तेलंगाणा विधानसभा निवडणुकीसाठी जाहीरनामा प्रसिद्ध केला. काँग्रेसने जाहीरनाम्यात ‘अभय हस्तम’ देण्याची 6 आश्वासने दिली. पक्षाने आपल्या जाहीरनाम्यात महिला आणि शेतकऱ्यांवर लक्ष केंद्रित करणाऱ्या अनेक योजनांचा समावेश केला आहे.6 guarantees of Congress, 200 units of electricity free in Telangana; 15 thousand to farmers, 5 lakh to students-homeless

बेघर आणि विद्यार्थ्यांना 5 लाख रुपये देण्याचे आश्वासन काँग्रेसने दिले आहे. याशिवाय महिलांना दरमहा अडीच हजार रुपये आणि मोफत बस प्रवासाची सुविधा देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. त्याचबरोबर राज्यातील सर्व शेतकऱ्यांना 15 हजार रुपये देण्याची घोषणा करण्यात आली आहे.



यावेळी हैदराबादमधील गांधी भवनात टीपीसीसीचे अध्यक्ष रेवंत रेड्डी आणि विरोधी पक्षनेते बत्ती विक्रमार्का उपस्थित होते.

महिलांसाठी महालक्ष्मी योजना

काँग्रेसने राज्यातील महिलांना दरमहा 2500 रुपये देण्याचे आश्वासन दिले आहे. पक्षाने या योजनेला ‘महालक्ष्मी योजना’ असे नाव दिले आहे. महिलांना 500 रुपयांत गॅस सिलिंडर आणि राज्य परिवहन TSRTC बसमध्ये मोफत प्रवास करण्याची घोषणाही करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांना एकरी 15 हजार रुपये देणार

पक्षाने राज्यातील सर्व शेतकऱ्यांना 15,000 रुपये प्रति एकर आणि शेतमजुरांना 12,000 रुपये आर्थिक मदत देण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच रायथू भरोसा योजनेंतर्गत धानासाठी प्रति क्विंटल 500 रुपये देण्याचे आश्वासन दिले आहे.

सरकार आल्यास 200 युनिट वीज मोफत मिळणार

राज्यात काँग्रेसचे सरकार आल्यास गृहज्योती योजनेंतर्गत प्रत्येक कुटुंबाला 200 युनिट मोफत वीज दिली जाईल, असे काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात जाहीर केले आहे.

बेघरांना जमीन आणि 5 लाख रुपयांची मदत

काँग्रेसने सांगितले की, ज्या कुटुंबांकडे स्वतःचे घर नाही त्यांना ​​​​​​​इंदिराम्मा इंदलू योजनेंतर्गत सरकार घरासाठी जमीन आणि 5 लाख रुपयांची आर्थिक मदत देईल. याशिवाय तेलंगण चळवळीतील सैनिकांना 250 चौरस यार्डचे घरही दिले जाणार आहे.

विद्यार्थ्यांना 5 लाख रुपये मिळणार आहेत

काँग्रेसने जाहीरनाम्यात विद्यार्थ्यांसाठीच्या योजनेचाही समावेश केला आहे. पक्षाने जाहीर केले आहे की युवा विकास योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना 5 लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य कार्ड दिले जाईल, ज्याचा वापर कॉलेज फी भरण्यासाठी केला जाऊ शकतो.

दुर्बल घटकांना 4,000 रुपये मासिक मदत

जाहीरनाम्यात, पक्षाने चेयुथा योजनेंतर्गत मासिक 4,000 रुपये पेन्शन देण्याचे आश्वासन दिले आहे. त्याचा लाभ वृद्ध, विधवा, अपंग, विडी कामगार, एकल महिला, विणकर, एड्स-फायलेरियासिस रुग्ण आणि डायलिसिस घेत असलेल्या किडनी रुग्णांना मिळणार आहे. याशिवाय, पक्षाने त्यांच्यासाठी 10 लाख रुपयांचा आरोग्य विमा देऊ असेही म्हटले आहे.

6 guarantees of Congress, 200 units of electricity free in Telangana; 15 thousand to farmers, 5 lakh to students-homeless

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात