लोकसभा उमेदवाराचा 6 कोटी खर्च; मर्यादा 95 लाखांची, 1.2 लाख कोटींहून जास्त खर्चाचा अंदाज

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : 18वी लोकसभा निवडणूक देश आणि जगातील सर्वात महागडी निवडणूक होण्याची शक्यता आहे. एका अंदाजानुसार १.२ लाख कोटी रुपयांहून जास्त खर्च होऊ शकतात. देशात राजकीय खर्चावर निगराणी ठेवणारी सेंटर फॉर मीडिया स्टडीज (सीएमएस) या संस्थेनुसार अमेरिकेत २०२० मध्ये अध्यक्षीय निवडणुकीत सुमारे १.२ लाख कोटी रुपये खर्च झाले होते. ते पाहता ही जगातील सर्वात महागडी निवडणूक ठरू शकते.6 crore expenses of a Lok Sabha candidate; 95 lakhs limit, estimated cost over 1.2 lakh crores



२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत जाहीर व अघोषित एकूण ६० हजार कोटी रुपये खर्च झाले होते. यंदा दुप्पट खर्च होईल. निवडणूक आयाेगाने प्रत्येकी उमेदवारासाठी खर्चाची मर्यादा ९५ लाख रुपये अशी घालून दिली असताना प्रत्यक्षात प्रत्येक उमेदवार २० दिवसांच्या प्रचारावर सरासरी ५.७५ कोटी रुपये खर्च करतो. म्हणजेच उर्वरित पैसा राजकीय पक्ष किंवा अज्ञात स्रोतातून आलेल्या पैशांतून केला जातो.

५४३ जागांवर प्रत्येक उमेदवाराचा खर्च काढल्यास तो ३,११२ कोटी रुपये होईल. त्यात प्रचार व जाहिरातीचा खर्च जोडलेला नाही. खरे तर यावरील खर्च सर्वाधिक असतो. आयोग, प्रायोजक, इतर खर्च वेगळा आहे. अनेक राज्यांत मतदारांना आकर्षित करण्यासाठी होणाऱ्या खर्चाचा हिशेबदेखील नाही.

राजकीय पक्ष दरवर्षी निवडणुकीवरील खर्चात वाढ करण्याची मागणी करतात. आयोगाला दिलेल्या अहवालात ९८ टक्के उमेदवार ६०-६५ टक्के खर्चच दाखवतात. पक्षांच्या खर्चावर मर्यादा नाही. खर्चाला सीमा असावी. – मेजर जनरल (निवृत्त) अनिल वर्मा, हेड, एडीआर​​​​​​​

​​​​​​​विमान- हेलिकॉप्टरचे भाडेदेखील वाढवले

विशेष विमाने व हेलिकॉप्टरची मागणी गेल्या निवडणुकीच्या तुलनेत ४० टक्के वाढण्याची शक्यता आहे. विशेष विमानाचे भाडे ताशी ४.५ लाख ते ५.२५ लाख रुपये असे अाकारले जाऊ शकते. हेलिकॉप्टरसाठी हे भाडे ताशी १.५ लाख रुपये घेतले जाऊ शकते. २०१९-२० वार्षिक ऑडिट खात्यानुसार सत्ताधारी भाजपने २५० कोटींहून जास्त खर्च केले होते.​​​​​​​

6 crore expenses of a Lok Sabha candidate; 95 lakhs limit, estimated cost over 1.2 lakh crores

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात