काश्मीरमध्ये 50 टार्गेट किलिंग, 60 हल्ले करणारा कुख्यात बासित ठार; मृत अतिरेक्यावर होते 10 लाखांचे इनाम

वृत्तसंस्था

श्रीनगर : खोऱ्यात मुस्लिम, काश्मिरी पंडितांच्या हत्यांचा मास्टरमाइंड अतिरेकी बासित अहमद दार (३०) मंगळवारी चकमकीत ठार झाला. लष्कराने दक्षिण काश्मीरच्या कुलगाम येथे १२ तास चाललेल्या चकमकीत त्याला कंठस्नान घातले. द रेसिस्टंट फ्रंट (टीआरएफ) नावाच्या संघटनेचा सदस्य बासित काश्मीरचा मोस्ट वाँटेड अतिरेकी होता. काश्मिरात २०२१ पासून आतापर्यंत ५० पेक्षा जास्त टार्गेट50 Target Killings, 60 Attackers Notorious Basit Killed in Kashmir; There was a reward of 10 lakhs on the dead terrorist



काश्मिरात ५० टार्गेट किलिंग…किलिंग झाली. पैकी बहुतांश बासितने घडवून आणल्या. बासितने २०२४ मध्ये दक्षिण काश्मीरात आतापर्यंत दोन टार्गेट किलिंग केली होती. ८० दहशतवादी हल्ल्यांत त्याचा सहभाग होता. या कारणास्तव राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) त्याच्यावर १० लाख रुपयांचे बक्षीस ठेवले होते. बासित हा कुलगामच्या रेडवानी भागात लपल्याची माहिती सोमवारी रात्री लष्कराला मिळाली होती. रात्रभर सैनिकांनी त्याच्यावर नजर ठेवली. सकाळी ऑपरेशन सुरू झाले. यामध्ये बासितसह दोन दहशतवादी मारले गेले. काश्मीर पोलिस महानिरीक्षक व्ही. के. बिर्डी म्हणाले, बासित हा A++ श्रेणीचा दहशतवादी होता.

क्रिकेट खेळणाऱ्या पोलिसांचा मारेकरीही ठार

कुलगाममध्ये मारला गेलेला दुसरा दहशतवादी मोमीन गुलजार आहे. तो श्रीनगर डाऊनटाऊनचा रहिवासी आहे. गतवर्षी श्रीनगरात क्रिकेट खेळताना मोमीनने एका पोलिसाची हत्या केली होती. अतिरेकी बासित हा एप्रिल २०२१ मध्ये दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाचा सदस्य बनला आणि नंतर तो ‘लष्कर’ची सहयोगी संघटना टीआरएफचा सदस्य झाला. २०२१ मध्ये टीआरएफचा प्रमुख शेख अब्बास याच्या हत्येनंतर बासितने स्वतःला नेता घोषित केले होते. तीन वर्षांमध्ये त्याचा प्रथमच लष्करासोबत थेट आमना-सामना झाला होता.

50 Target Killings, 60 Attackers Notorious Basit Killed in Kashmir; There was a reward of 10 lakhs on the dead terrorist

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात