काश्मीरमध्ये टार्गेट किलिंगमध्ये सामील 47 मॉड्यूल नष्ट; हिज्बूल कमांडर तालिब हुसैनला बंगळुरूतून अटक

वृत्तसंस्था

श्रीनगर : जम्मू – काश्मीरध्ये टार्गेटेड किलिंगमध्ये सामील असणाऱ्या 47 फुटीरतावादी दहशतवाद्यांना पोलीसांनी अटक केली असून पोलिसांनी हिज्बूल मुजाहिद्दीनचा कमांडर तालिब हुसैनला बंगळुरू येथून जिवंत पकडले आहे. दहशतवाद्यांच्या यादीत त्याचा समावेश आहे. 17 राष्ट्रीय रायफल्स आणि जम्मू-काश्मीर पोलिसांच्या संयुक्त कारवाईत हे यश मिळाले. हिज्बूल मुजाहिद्दीनने किश्तवाड भागात नव्याने भरती करून आपल्या कॅडरची पुनर्रचना आणि बळकटीकरण करण्यास सुरुवात केली होती.47 modules involved in target killing destroyed in Kashmir; Hezbollah commander Talib Hussain arrested in Bangalore

तालिब हा किश्तवाडमध्ये बराच काळ सक्रिय होता. नंतर तो बंगळुरू पळून जाऊन लपला होता आणि तेथून दहशतवादी कारवाया करत होता. तेथे पोहोचल्यानंतर पथकाने तालिबचा माग काढला. त्याच्या अटकेने किश्तवाडमधील दहशतवादी घटना कमी होतील.



गेल्या 5 महिन्यात टार्गेट किलिंगमध्ये सामील असणाऱ्या 47 फुटीरतावादी दहशतवाद्यांना पोलीसांनी अटक केली आहे. सध्या वातावरण शांत आहे. 5 महिन्यांत निवडक हत्यांमध्ये सहभागी असलेले 47 जण पकडले असून त्यांना मदत करणाऱ्यांनाही पकडण्यात आले.

5 मुलांचा बाप असलेला तालिब गुर्जर हिजबुलमध्ये सामील झाल्यानंतर अनेकदा किश्तवाड जिल्ह्यातील मारवाह आणि दाछनच्या वरच्या भागात शस्त्रांसह फिरताना दिसत होता. यासोबतच या भागात सक्रिय असलेले आणखी काही दहशतवादीही दिसले. तालिबच्या कुटुंबीयांनी अनेकवेळा पोलिस अधिकाऱ्यांशी संपर्क साधला होता आणि तालिबला हिंसाचाराचा मार्ग सोडून मुख्य प्रवाहात येण्यास प्रवृत्त करण्यासाठी मदत मागितली होती.

2016 पासून तालिब निशाण्यावर होता

जम्मूमधील किश्तवाड हा एकमेव जिल्हा आहे. जिथे हिजबुल दहशतवाद्यांच्या कारवाया रोजच चर्चेत असतात. तालिब हुसैन हा सर्वात जास्त काळ जगलेला दहशतवादी आहे. 2016 पासून तो दहशतवादी कारवायांमध्ये सामील होता. तालिब गुर्जर हा स्थानिक गुर्जर जमातीचा आहे, जो इथल्या डोंगराळ रस्त्यांशी परिचित आहे. 2016 मध्ये तालिब गुर्जर रहस्यमयरीत्या गायब झाला होता. त्याला आता पोलीसांनी अटक केली आहे.

47 modules involved in target killing destroyed in Kashmir; Hezbollah commander Talib Hussain arrested in Bangalore

महत्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात