वृत्तसंस्था
पाटणा : बिहारमध्ये जिउतिया सणादरम्यान ( Jiutiya festival ) नदी आणि तलावात आंघोळ करताना झालेल्या अपघातात आतापर्यंत 43 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 37 मुले आणि 6 महिलांचा समावेश आहे. या सर्वांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.
24 आणि 25 सप्टेंबर रोजी हे अपघात झाले. औरंगाबाद जिल्ह्यात सर्वाधिक 10 मृत्यू झाले आहेत. येथे दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये 8 मुलांचा बुडून मृत्यू झाला.
वेगवेगळ्या ठिकाणांहून आलेल्या वृत्तानुसार, मृतांचा आकडा वाढू शकतो. अजूनही अनेक लोक बेपत्ता आहेत. त्यांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. राज्यातील 16 जिल्ह्यांमध्ये हे अपघात झाले आहेत. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आहे.
प्रथम जिउतिया सणाबद्दल जाणून घ्या… बिहार, झारखंड आणि पूर्व उत्तर प्रदेशातील काही भागात जिउतिया किंवा जीवितपुत्रिका व्रत पाळले जाते. या दिवशी स्त्रिया आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी 24 तास काहीही न खाता-पिता उपवास करतात. यामध्ये भगवान जीमूतवाहन यांची विधीवत पूजा केली जाते.
उपवासाच्या दिवशी सकाळी उठून स्नान करून सूर्यदेवाची पूजा केली जाते. गृहमंदिरात एका ताटात सूर्यनारायणाची मूर्ती बसवली जाते. त्यांना दुधाने आंघोळ घातली जाते. देवाला दिवे आणि उदबत्ती अर्पण करून आरती केली जाते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App