Nitin Gadkari : नितीन गडकरींना पंतप्रधान पदाची ऑफर ही तर विरोधक दोनदा तोंडावर पडल्याची कहाणी!!

नाशिक : विरोधकांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी नितीन गडकरींना पंतप्रधान पदाची ऑफर दिली होती. परंतु, त्यांनी ती फेटाळली होती. याची कहाणी स्वतः नितीन गडकरींनी नागपुरातल्या एका कार्यक्रमात सांगितली होती. इंडिया टुडेच्या कन्क्लेव्हमध्ये पुन्हा एकदा त्याच गोष्टीचा मोठा उहापोह झाला. इंडिया टुडेच्या पत्रकारांनी नितीन गडकरींना वारंवार तेच ते प्रश्न विचारून भंडावून सोडण्याचा प्रयत्न केला. परंतु नितीन गडकरी बधले नाहीत. विरोधकांनी आपल्याला पंतप्रधान पदाची ऑफर दिली होती ती निवडणुकीपूर्वी दिली होती आणि निवडणुकीनंतरही दिली होती, असा गौप्यस्फोट गडकरींनी करून लिबरल मीडियात खळबळ उडवून दिली. त्याचवेळी राजदीप सरदेसाईंनी तर शरद पवार, उद्धव ठाकरे, सोनिया गांधी यांच्यापैकी तुम्हाला कोणी ऑफर दिली??, असा थेट नावे घेऊन प्रश्न विचारला, पण मी त्यांची नावे सांगणार नाही. खासगी चर्चा अशा चौकात उभा राहिल्या सारख्या सार्वजनिकरित्या सांगायच्या नसतात असे गडकरींनी त्यांना स्पष्ट सुनावले.

यातून नितीन गडकरींच्या पंतप्रधान पदाची चर्चा भारतीय राजकारणाच्या वातावरणात तरंगत जरूर राहिली. परंतु लिबरल मीडियाने त्याचा काढलेला अर्थ फार मर्यादित ठरला. जणू काही नितीन गडकरींना विरोधकांनी पंतप्रधान पदाची ऑफर दिल्याने भाजपमध्ये नरेंद्र मोदी यांच्या विरोधात मोठी फूट पडून भारतीय राजकारणात भूकंपच आला असता, असा आभास मीडियाने निर्माण केला. गडकरींच्या पंतप्रधान पदाच्या ऑफरच्या कहाणीच्या निमित्ताने भाजपमध्ये यानिमित्ताने फार मोठे मंथन घडले असते, त्यातून अनेकांचे पत्ते कापले गेले असते, खरंच तसे सत्ता परिवर्तन झाले असते तर जणू काही भाजप नावाचा पक्ष कोसळूनच पडला असता असा अर्थ लिबरल मीडियाने काढला.


Aadhaar PAN : केंद्र सरकारने आधार, पॅन कार्डची माहिती लीक करणाऱ्या वेबसाइट केल्या ब्लॉक!


आणि नेमकी हीच नितीन गडकरींच्या पंतप्रधान पदाच्या ऑफरच्या कहाणीतून लिबरल मीडियाने काढलेल्या अर्थाची राजकीय बौद्धिक मर्यादा आहे. कारण नितीन गडकरींनी उघडपणे विरोधकांनी दोन वेळा ऑफर दिली, असे सांगितले. पण आपण विचारधारेशी कमिटेड आहोत. विचारधारेशी तडजोड करणार नाही, असे सांगून ती ऑफर नाकारली. पण ऑफर देणाऱ्यांची नावे आपण सांगणार नाही, असे सांगून खरे तर नितीन गडकरींनी उतावळ्या विरोधकांना त्यांची जागा दाखवून देत पूर्ण उघडे केले. यातली नावे गडकरींनी न सांगता देखील अनेकांना समजल्याशिवाय राहिली नाहीत.

विरोधकांची उतावळी खेळी फसली

अर्थात विरोधकांना एकत्र येऊन देखील लोकसभा निवडणुकीत अपयश आले. त्यांना त्यांच्या स्वतःच्या मनातला पंतप्रधान करता आला नाही. इतकेच काय, पण 10 वर्षांच्या सत्तेच्या दुष्काळाच्या झळा सहन होईनाशा झाल्या म्हणून त्यांनी विचारांशी कमिटेड असलेल्या नितीन गडकरींना देखील ऑफर देऊन पाहिली, पण त्यात देखील विरोधक पूर्णपणे अपयशीच ठरले. खरंतर विरोधकांना नितीन गडकरींना एवढ्या मोठ्या पदाची ऑफर देऊन देखील “पटवता” आले नाही. त्यात विरोधक दोनदा तोंडावर पडल्याची ही खरी कहाणी आहे. मात्र हा अर्थ लिबरल मीडियाला काढता आला नाही. कारण तो त्यांच्या राजकीय बुद्धीच्या बाहेरचा आहे. लिबरल मीडिया भाजप मधल्या नसलेल्या फटी शोधत राहिला, पण विरोधकांच्या उतावळ्या आणि फसलेल्या खेळी लिबरल मीडियाला दिसल्या नाहीत.

Story of nitin gadkari prime ministership

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात